कोण आहे ‘कोरोना’चा पहिला रुग्ण? ज्याच्यामुळे जगभर पसरला महाभंयकर व्हायरस

कोण आहे ‘कोरोना’चा पहिला रुग्ण? ज्याच्यामुळे जगभर पसरला महाभंयकर व्हायरस

कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) पहिला रुग्ण (patient zero) सापडल्यास या विषाणूच्या उपचारातही बरंच यश मिळू शकतं, असं म्हटलं जातं आहे.

  • Share this:

बीजिंग, 10 मार्च : कोरोनाव्हायरस (Coronavirus) ज्याने चीनपाठोपाठ (China) 100 पेक्षा अधिक देशांना विळखा घातला. आतापर्यंत एकूण 1 लाखापेक्षा जास्त लोकांना या विषाणूची लागण झाली, तर तब्बल 4 हजार जणांचा मृत्यू झाला आहे.  जगभर हा महाभयंकर व्हायरस पसरल्यानंतर आता पहिल्या रुग्णाचा (first patient of coronavirus) शोध सुरू झाला आहे. कोरोनाव्हायरसचा पहिला रुग्ण सापडल्यास उपचारात बरं यश मिळू शकतं, असं मानलं जातं. यामुळे व्हायरसची उत्पत्ती कुठे, कशी आणि केव्हा झाली याची माहिती मिळवता येऊ शकते.

आजाराचा पहिला रुग्ण ज्याला वैद्यकीय भाषेत पेशंट झीरो (patient zero) म्हटलं जातं, जो कोणत्याही व्हायरसचा पहिला रुग्ण असतो.

संबंधित - जगातील सर्वात हेल्दी देशही 'कोरोना'च्या विळख्यात, व्हायरसमुळे झाले बेजार

बीबीसीवर प्रकाशित एका रिपोर्टनुसार, चीन सरकार आणि तज्ज्ञांमध्ये पेशंट झीरोबाबत मतभेद आहेत.

वटवाघूळ की साप?

कोरोनाव्हायरसच्या उत्पतीबाबत अनेक शोध समोर आलेत. जेव्हा चीनमध्ये कोविड-19 (COVID-19) ची प्रकरणं झपाट्यानं वाढू लागली, तेव्हा एका अभ्यासानुसार हा व्हायरस चीनच्या विषारी सापासून आल्याचं सांगण्यात आलं. मात्र त्यानंतर वटवाघूळ या व्हायरसचा स्रोत असल्याचं म्हटलं गेलं. अद्यापही वटवाघूळ की साप, कुणाकडून कोरोनाव्हायरस आला, याबाबत संशोधकांना ठोस काही सापडलं नाही.

कोरोनाव्हायरसचं केंद्र वुहान?

डिसेंबरमध्ये चीन सरकारने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाव्हायरसच्या सुरुवातीच्या रुग्णांमध्ये न्युमोनियासारखी लक्षणं दिसून आली. यापैकी बहुतेक प्रकरणं हुबेई प्रांतातल्या वुहान शहरातील सी-फूड मार्केटशी संबंधित होती. त्यामुळे चीनच्या वुहान शहराला कोरोनाव्हायरसचं जागतिक केंद्र आहे.

संबंधित - सावधान ! तुम्ही वापरत असलेल्या नोटांवरही असू शकतो ‘कोरोना’

जगभरात कोरोनाव्हायरसची सर्वाधिक प्रकरणं आणि मृत्यू याच ठिकाणी झालेत. मात्र आता इटली आणि इराणमध्येही कोरोनाव्हायरसचा प्रकोप वाढतो आहे.

तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे?

कोरोनाव्हायरसच्या झीरो पेशंटबाबत चीन सरकारने केलेल्या दाव्याच्या उलट तज्ज्ञांची मतं आहेत. तज्ज्ञांच्या मते पेशंट झीरोचा मीट मार्केटशी काहीही संबंध नाही. लँसेट जर्नलमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार कोरोनाव्हायरसचा पहिलं प्रकरण 1 डिसेंबर, 2019 मध्येच समोर आलं होतं. ज्या व्यक्तीला कोरोनाव्हायरसची पहिल्यांदा लागण झाली त्याचा सी-फूड मार्केटशी संपर्क आला नव्हता. आश्चर्य म्हणजे कोरोनाव्हायरसचा पहिला रुग्ण 1 डिसेंबरला आढळल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आणि ही तारीख वुहानमध्ये कोरोनाव्हायरस पसरण्याआधी खूप आधीची आहे.

संबंधित - पुण्यातही धडकला कोरोना, दोन रुग्ण सापडल्याने खळबळ

फेब्रुवारीच्या अखेर चीनी वृत्तपत्र साऊथ चायना मॉर्निंग पोस्टमध्ये प्रकाशित एका रिपोर्टमध्येही कोरोनाव्हायरसचं उत्पत्ती केंद्र वुहानचं सी-फूड मार्केट नसल्याचा दावा करण्यात आला आहे. चायनीज अॅकेडमी ऑफ सायन्स आणि चायनीज इन्स्टिट्युट ऑफ ब्रेनच्या एका रिसर्चमध्ये हा दावा करण्यात आला होता. डॉ. यू वेनबिन यांच्या नेतृत्वात डॉक्टरांच्या टीमने अभ्यास करून हा निष्कर्ष काढला होता. सी-फूड मार्केटमधून पसरण्यापूर्वीच कोरोनाव्हायरस पसरला होता, असं या अभ्यासात दिसून आलं होतं. या अभ्यासानुसार तर कोरोनाव्हायरस खूप आधी म्हणजे नोव्हेंबरपासूनच पसरण्यास सुरुवात झाल्याचं सांगण्यात आलं.

जागतिक आरोग्य संघटनेचं काय सांगते?

कोरोनाव्हायरसच्या उत्पत्तीबाबत जो सर्वात आधी निष्कर्ष लावण्यात आला होता, त्यावरच जागतिक आरोग्य संघटना (WHO) टिकून आहे. एखाद्या विषारी प्राण्यामार्फत हा व्हायरस माणसांमध्ये पसरल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.

संबंधित - मेट्रो, एसी बसमधून प्रवास करताय सावधान ! तुम्हाला होऊ शकतो 'कोरोना'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 13, 2020 09:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading