Home /News /national /

Good News:सप्टेबरपर्यंत येणार कोरोना लस, 100 पेक्षा जास्त देशाचे वैज्ञानिक गुंतले संशोधनात

Good News:सप्टेबरपर्यंत येणार कोरोना लस, 100 पेक्षा जास्त देशाचे वैज्ञानिक गुंतले संशोधनात

पुढील आठवड्यापर्यंत ही प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित आहे. चाचणीच्या पहिल्या टप्प्यासाठी शास्त्रज्ञांनी 510 लोकांची निवड केली आहे.

नवी दिल्ली, 17 एप्रिल: कोरोना व्हायरसचा समूळ नायनाट करण्यासाठी आता सर्व देश कोरोना लस तयार करण्यात गुंतले आहेत. अमेरिकेतील ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी लसीच्या चाचणीच्या पहिल्या टप्प्यातील तयारी पूर्ण केली आहे. पुढील आठवड्यापर्यंत ही प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित आहे. चाचणीच्या पहिल्या टप्प्यासाठी शास्त्रज्ञांनी 510 लोकांची निवड केली आहे,अशी माहिती मिळाली आहे. अमेरिकेतील ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे प्राख्यात संशोधक प्रो. अ‍ॅड्रियन हिल यांच्या नेतृत्त्वातील चमू लसीचे संशोधन करत आहे. या चाचणीसाठी निवडलेले लोक 18 ते 55 वयोगटातील आहेत. पुढच्या आठवड्यापासून मानवावर लसीची चाचणी करण्यात येणार आहे. पूर्वी या लसची चाचणी वेगवेगळ्या प्रजातींच्या प्राण्यांवर केल्या गेली आहे. हेही वाचा..  महिन्यांच्या चिमुकल्यापासून 81 वर्षांच्या आजीबाईंपर्यंत कोरोनाशी यशस्वी लढा चिंपांझीमध्ये विषाणूचे इंजेक्शन लावल्यानंतर ही लस तयार करण्यात आली आहे. चिंपांझीच्या परीक्षणानंतर ही लस आता मानवाला देण्यात येणार आहे. कोरोना व्हायरसविरुद्ध लढा देण्यासाठी त्यांच्यात प्रतिपिंडे तयार झाले होते. शास्त्रज्ञांना आशा आहे की, या अँटीबॉडीजमुळे विषाणू मानवांपासून लांब राहील. या लसीची सर्व चाचणी यशस्वी झाली तर सप्टेंबरपर्यंत ते वापरासाठी तयार होईल, अशी अपेक्षा शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. हेही वाचा..'या' देशात सापडला होता सर्वात पहिला Coronavirus, महिला डॉक्टरने लावला शोध जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, जगातील शेकडो देशांचे शास्त्रज्ञ लस तयार करण्यात व्यस्त आहेत. शास्त्रज्ञांचे सध्या 70 लसींवर संशोधन चालू आहे. अमेरिका आणि चीनमधील तीन शास्त्रज्ञांच्या पथकाने मानवांवर लसीची चाचणीही सुरू केली आहे. मात्र, या दरम्यान भारतात देखील लस तयार करण्यासाठी युद्ध स्तरावर प्रयत्न सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील युवा वैज्ञानिकांना समोर येऊन लस तयार करण्याचे आवाहन केलं आहे. संपादन- संदीप पारोळेकर
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Corona

पुढील बातम्या