मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /6 महिन्यांच्या चिमुकल्यापासून 81 वर्षांच्या आजीबाईंपर्यंत कोरोनाशी यशस्वी लढा- राजेश टोपे

6 महिन्यांच्या चिमुकल्यापासून 81 वर्षांच्या आजीबाईंपर्यंत कोरोनाशी यशस्वी लढा- राजेश टोपे

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3100 च्यावर आहे. मात्र समाधानकारक बाब म्हणजे राज्यात 70 टक्के नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसलेली नाही.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3100 च्यावर आहे. मात्र समाधानकारक बाब म्हणजे राज्यात 70 टक्के नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसलेली नाही.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3100 च्यावर आहे. मात्र समाधानकारक बाब म्हणजे राज्यात 70 टक्के नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसलेली नाही.

मुंबई, 16 एप्रिल: राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3100 च्यावर आहेत. मात्र आतापर्यंत 300 लोक या आजारातून बरे झाले आहेत. या आजाराला घाबरायचं कारण नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. समाधानकारक बाब म्हणजे राज्यात 70 टक्के नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसलेली नाही. 6 महिन्यांच्या चिमुकल्यापासून 81 वर्षाच्या आजीबाईंनी कोरोनाशी यशस्वी लढा दिला आहे. पूर्णपणे बरे होऊन बहुतांश रुग्ण घरी गेले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी सांयकाळी दिली. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आरोग्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला.

हेही वाचा..Lockdown मध्ये लोककलावंतांना दिलासा, शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय

राज्यात एकूण 36 ठिकाणी टेस्टिंग लॅब उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आतापर्यंत राज्यात 51 हजार तर मुंबईत 25 हजार नागरिकांची कोरोना टेस्ट घेण्यात आली आहे. ज्या तुमच्या कोरोना सदृश्य लक्षणं दिसत असतील तर तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधवा, असं आवाहनही राजेश टोपे यांनी केलं आहे.

आणखी काय म्हणाले आरोग्यमंत्री?

-6 महिन्यांचं बाळ कोरोनाग्रस्त होतं, ते आता ठणठणीत आहे

-81 वर्षीय आजीने कोरोनाचा पराभव केला आहे.

-कोरोनामुळे दगावणाऱ्यांची संख्या निश्चितच जास्त आहे. परंतु, काही जणांच्या मृत्यूचं कारण वेगळं आहे.

-सरकार मृतांचे ऑडिट करणार आहे.

- रुग्णाला रुग्णालयात दाखल करणे, उपचार आणि उपचारादरम्यान मृत्यू या सर्व बाबीचं ऑडिट होणार आहे.

- यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. डॉ. संजय ओक या समितीचं नेतृत्व करत आहेत.

- 70 टक्के नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून आली नाहीत.

-राज्यात सध्या  3100 कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

-आतापर्यंत 300 लोक या आजारातून बरे झाले आहेत.

- एकूण 36 लॅब आपण उपलब्ध करून देत आहोत.

- आतापर्यंत राज्यात 194 जणांचा मृत्यू झाला असून, मृत्यूचा दर अधिक आहे.

- प्लाझ्मा थेरेपीसाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे.

- केंद्र सरकारकडे जास्त पीपीई किटची मागणी केली आहे.

First published:

Tags: Corona