Home /News /videsh /

'या' देशात सापडला होता सर्वात पहिला Coronavirus, महिला डॉक्टरने लावला शोध

'या' देशात सापडला होता सर्वात पहिला Coronavirus, महिला डॉक्टरने लावला शोध

व्हायरोलॉजिस्ट डॉ. जून अल्मेडा (June Almeida) यांनी लंडनमध्ये पहिल्या coronavirus चा शोध लावला होता.

    लंडन, 16 एप्रिल : कोरोनाव्हायरसने (coronavirus) जगभर थैमान घातलं आहे. चीनमध्ये या व्हायरसचा उद्रेक झाला होता. मात्र तुम्हाला माहिती आहे, सर्वात पहिला कोरोनाव्हायरस लंडनमध्ये (london) सापडला होता. एका महिला डॉक्टरने या व्हायरसचा शोध लावला होता. व्हायरोलॉजिस्ट डॉ. जून अल्मेडा (June Almeida) यांनी पहिला कोरोनाव्हायरस शोधला. 1964 मध्ये लंडनच्या सेंट थॉमस हॉस्पिटलमधील लॅबमध्ये त्यांनी पहिल्या कोरोनाव्हायरसचा शोध लावला. कोण होत्या डॉ. जून अल्मेडा? स्कॉटलंडच्या ग्लासगोतील एका सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील ड्रायव्हर होते. काही कारणामुळे वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांना आपलं शिक्षण सोडावं लागलं. सुरुवातीला ग्लासगो शहरातील एका लॅबमध्ये त्यांनी टेक्निशयन म्हणून नोकरी केली. त्यानंतर कॅनडात त्यांनी आपलं डॉक्टरकीचं शिक्षण पूर्ण केलं. तिथल्याच ओंटारियो कॅन्सर इन्स्टिट्युटमध्ये त्यांनी व्हायरसवर काम सुरू केलं. त्यांनी असा मार्ग शोधून काढला ज्यामुळे व्हायरसबाबत माहिती मिळवणं आणि त्याला समजून घेणं अधिक सोपं झालं. त्याचवेळी त्यांना 1964 साली लंडनच्या सेंट थॉमस मेडिकल स्कूलमध्ये काम करण्याचा प्रस्ताव आला जो त्यांनी स्वीकारला. लंडनमध्ये शोधला कोरोनाव्हायरस डॉ. अल्मेडा यांनी आपला रिसर्च सुरू केला. त्यावेळी त्यांच्याकडे तपासणीसाठी व्हायरसचा एक असा नमुना आला जो इनफ्लूएंझा व्हायरसप्रमाणे दिसत होता मात्र तो व्हायरस नव्हता, तो वेगळा होता आणि हा व्हायरस कोरोनाव्हायरस असल्याचं डॉ. अल्मेडा यांनी सांगितलं. सुरुवातीला डॉ. अल्मेडा यांचा रिसर्च कोणी मानला नाही. त्यांनी इनफ्लूएंझाची इमेज बदलून दाखवल्याचं म्हटलं गेलं, मात्र नंतर हा वेगळा व्हायरस असल्याचं मानावं लागलं. त्यानंतर या नव्या व्हायरसचा रिसर्च 1965 साली ब्रिटिश मेडिकल जर्नल आणि त्याच्या 2 वर्षांनी जर्नल ऑफ जनरल व्हायरोलॉजीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलं. यानंतर डॉ. अल्मेडा वेलकॉम इन्स्टिट्युटमध्ये होत्या, जिथं त्यांनी अनेक व्हायरसचा शोध लावला. निवृत्तीनंतर त्या योगा प्रशिक्षक झाल्या. 2007 साली वयाच्या 77 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. ठणठणीत बऱ्या झालेल्या कोरोनारुग्णांचं रक्त करणार अत्यवस्थ रुग्णांवर उपचार 6 महिन्यांच्या चिमुकल्यापासून 81 वर्षांच्या आजीबाईंपर्यंत कोरोनाशी यशस्वी लढा संकलन, संपादन - प्रिया लाड
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या