Home /News /national /

COVID-19: आता 84 दिवसांनंतरच मिळणार Covishield चा दुसरा डोस, CoWIN पोर्टलमध्येही होणार बदल

COVID-19: आता 84 दिवसांनंतरच मिळणार Covishield चा दुसरा डोस, CoWIN पोर्टलमध्येही होणार बदल

आता कोविशिल्ड (Covishield) वॅक्सिनसाठी 12 आठवड्यांनंतरच अपॉईंटमेंट मिळेल. केंद्राने रविवारी कोविशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी ऑनलाईन अपॉईंटमेंट 84 दिवसांनंतरच दिली जाणार असल्याची माहिती दिली.

    नवी दिल्ली, 16 मे : कोरोना व्हायरसविरोधात (Coronavirus) लसीकरणा दरम्यान (Corona Vaccination) आता कोविशिल्ड (Covishield) वॅक्सिनसाठी 12 आठवड्यांनंतरच अपॉईंटमेंट मिळेल. केंद्राने रविवारी कोविशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी ऑनलाईन अपॉईंटमेंट 84 दिवसांनंतरच दिली जाणार असल्याची माहिती दिली. त्याशिवाय, ज्या लोकांनी कोविशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी आधीच आपली अपॉईंटमेंट बुक केली असेल, तर त्यांच्यावर याचा कोणताही परिणाम होणार नाही. जर अपॉईंटमेंट बुक झाली असेल, आणि कोणाला 84 दिवसांप्रमाणे बदल करायचा असल्यास, ते करू शकतात. कोविशिल्ड वॅक्सिनच्या दोन डोसदरम्यान वाढवलेल्या वेळेदरम्यान आता कोविन पोर्टलमध्येही (CoWIN Digital Portal) बदल केले जाऊ शकतात. केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, कोविन डिजीटल पोर्टलमध्ये आवश्यक ते बदल केले जात आहेत, जेणेकरुन कोविशिल्डच्या दोन डोसमधील 12 ते 16 आठवड्यांमधील अंतर तेथे दाखवलं जाऊ शकेल. या निर्णयाच्या आधीपासून दुसऱ्या डोससाठीची घेतलेली ऑनलाईन अपॉईंटमेंट मान्य असेल, ते कोविन अ‍ॅपद्वारा रद्द केलं जाणार नाही.

    (वाचा - Cyclone Tauktae: वादळाचा धोका लक्षात घेता सोमवारी मुंबईत लसीकरण बंद)

    गेल्या काही महिन्यात दुसऱ्यांदा कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्यात आलं आहे. याआधी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने, मार्चमध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना, कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर 28 दिवसांवरुन 6 ते 8 आठवडे करावं असं सांगितलं होतं.

    (वाचा - घाईगडबडीत हे 5 बनावट CoWin वॅक्सिन अ‍ॅप डाउनलोड करू नका, सरकारचा इशारा)

    परंतु कोरोना वॅक्सिनच्या कमतरतेदरम्यान, लसीकरणावर गठित सरकारी पॅनल, नॅशनल टेक्निकल अ‍ॅडव्हायजरी ग्रुप अर्थात NTAGI ने लशीबाबत काही शिफारसी करण्यात आल्या होत्या. भारत सरकारने आता या सरकारी पॅनलच्या सल्ल्यानुसार, कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर 6 ते 8 आठवड्यांनी वाढवून 12 ते 16 आठवडे करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, NTAGI पॅनलद्वारा कोवॅक्सिन लशीच्या दोन डोसमधील अंतराबाबत कोणताही बदल सुचवला नाही.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Corona vaccination, Coronavirus

    पुढील बातम्या