मुंबई, 16 मे: तौत्के चक्रीवादळ (Cyclone Tauktae) आता गोव्याकडून महाराष्ट्राच्या (Maharashtra) किनारपट्टीभागाकडे सरकत आहे. तौत्के चक्रीवादळ येत्या काही तासांत आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस (Strong winds and heavy rain in Mumbai predicts) पडण्याची शक्यता आहे. यामुळेच सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबईतील कोरोना प्रतिबंधक लसीकरण उद्या म्हणजेच 17 मे 2021 रोजी बंद (Mumbai Covid vaccination closed tomorrow) ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तौत्के चक्रीवादळ हे मुंबईच्या दक्षिणेस साधारणत: 400 किलोमीटरवर असून पुढे गुजरातच्या दक्षिण-दक्षिणपूर्व दिशेला 800 किमी अंतरावर आहे. येत्या काळात वादळ आणखी तीव्र होणार असून मुंबईत ताशी 70 ते 80 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने सोमवारी लसीकरण बंद ठेवण्यात येणार आहे.
वाचा: चक्रीवादळाचा कोकण रेल्वेला फटका; एक्सप्रेस ट्रेनवर झाड कोसळल्यानं रेल्वेसेवा ठप्प
मुंबईत सोमवारी लसीकरण बंद ठेवण्यात आल्याचं मुंबई महानगरपालिकेने सांगितलं आहे. तसेच या पुढील लसीकरणाचे नियोजन हे मंगळवार किंवा बुधवारी सांगितले जाणार आहे. केंद्र शासनाने मार्गदर्शन केल्याप्रमाणे आता कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवले आहे. त्यामुळे आरोग्य सेवक आणि फ्रंटलाईन वर्कर यांच्या व्यतिरिक्त इतर कुणीही लसीकरणास पात्र होऊ शकत नाही. सोमवार ते बुधवार 60 वर्षांवरील नागरिसांसाठी वॉक इन लसीकरण पुढे वाढवत असल्याचंही मुंबई मनपाने सांगितलं आहे.
तौत्के चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टी, खासकरून किनारपट्टीच्या उत्तरेकडच्या भागातला समुद्र येत्या चोवीस तासात खवळलेला असेल. मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये आणि जे मच्छिमार समुद्रात असतील त्यांनी तातडीने किनाऱ्यावर यावं अशी सूचना देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccination, Coronavirus, Cyclone, Mumbai