• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • अमेरिकेत 28 लाख कोरोना रुग्ण; तरी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणतात, 'कोरोना आपोआप गायब होणार'

अमेरिकेत 28 लाख कोरोना रुग्ण; तरी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणतात, 'कोरोना आपोआप गायब होणार'

Washington: President Donald Trump talks to the media as he leaves the White House, Friday, Feb. 28, 2020 in Washington, on his way for a short stop at Andrews Air Force Base to board Air Force One for a campaign rally in North Charleston, S.C., for a campaign rally.AP/PTI(AP2_29_2020_000017B)

Washington: President Donald Trump talks to the media as he leaves the White House, Friday, Feb. 28, 2020 in Washington, on his way for a short stop at Andrews Air Force Base to board Air Force One for a campaign rally in North Charleston, S.C., for a campaign rally.AP/PTI(AP2_29_2020_000017B)

अमेरिकेत कोरोना संक्रमणाची परिस्थिती आणखी गंभीर होईल अशी चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (donald trump) मात्र अजब दावा करत आहेत.

 • Share this:
  वॉशिंग्टन, 02 जुलै : जगातील सर्वाधिक कोरोनाव्हायरसची प्रकरणं अमेरिकेत (coronavirus in amecria) आहे. अमेरिकेची स्थिती गंभीर होत आहे आणि आणखी खबरदारी घेतली नाही तर परिस्थिती अधिकच गंभीर होईल, अशी चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. असं असतानाही कोरोना आपोआप गायब होईल, असा अजब दावा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (donald trump) यांनी केला आहे. फॉक्स बिझनेसला दिलेल्या मुलाखतीत कोरोनाव्हायरस आपोआप गायब होईल, अशी मला आशा आहे, असं ट्रम्प म्हणाले. मुलाखतीदरम्यान ट्रम्प यांना कोरोनाव्हायरसच्या संक्रमणाबाबत प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा ते म्हणाले, हो. मला वाटतं कोरोना आपोआप गायब होईल आणि आपण लवकरच एक लसही तयार करू असंही मला वाटतं. आपण खूप मजबुतीने पुढे जात आहोत आणि लवकरच आपण चांगल्या परिस्थितीत येऊ असं मला वाटतं. काही दिवसातच हे सर्व गायब होईल, मला अशी आशा आहे. ट्रम्प यांनी दिलेल्या उत्तरामुळे सर्वांनाच धक्का बसला. नवी प्रकरणं वाढण्याबाबत तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता दरम्यान नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅलर्जी अँड इन्फेक्टीव्ह डिसिसीजच्या हेड अँथनी फॉसी म्हणाले, "अमेरिकेत पुन्हा गोष्टी बिघडत चालल्या आहेत आणि जर लवकरात लवकर पाऊले उचलली गेली नाहीत तर ती परिस्थिती हाताबाहेर जाईल. लोकांना मास्क घालावे लागतील आणि सोशल डिस्टन्सिंगचे सक्तीने पालन करावे लागेल. खबरदारी घेतली गेली नाही तर येत्या काळात अमेरिकेत दररोज एक लाखांहून अधिक केसेस येतील यात शंका नाही" हे वाचा - VIDEO : कोरोनामुळे झाला मृत्यू, दफनासाठी 500 मीटर खेचत नेला मृतदेह "न्यूयॉर्क आणि न्यू जर्सीनंतर आता कॅलिफोर्निया, टेक्सास आणि अ‍ॅरिझोना ही संक्रमणाची नवीन केंद्रे म्हणून उदयास आली आहेत. पुढील वर्षापर्यंत कोरोनाची लस उपलब्ध होईल अशी आशा आहे, मात्र त्याआधी बरीच आपत्ती उद्भवू शकते", असं फॉसी यांनी सांगितलं. अमेरिकेनं खरेदी केला रेमडेसिवीरचा संपूर्ण स्टॉक जगभरात कोरोनाव्हायरसची (coronavirus) संख्या वाढते आहे. अशात काही औषधं कोरोनाव्हायरसविरोधात प्रभावी ठरत आहेत. अशाच औषधांपैकी एक म्हणजे रेमडेसिवीर (Remdesivir). त्यामुळे अमेरिकेनं (America) आता या औषधाचा संपूर्ण स्टॉक खरेदी केला आहे. यूएस डिपार्टमेंड ऑफ हेल्थ अँड ह्युमन सर्व्हिसेजमार्फत 5 लाखांपेक्षा जास्त औषधांचे डोस खरेदी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ज्यामुळे इतर देशांना पुढील तीन महिने हे औषध मिळणारच नाही. हे वाचा - FACT CHECK - Budweiser कर्मचारी 12 वर्षे बिअर टँकमध्ये लघवी करत होता? अमेरिकेत आता एकूण 28 लाख कोरोना रुग्ण आहेत. फक्त बुधवारीच 52000 पेक्षा जास्त नवीन प्रकरणं समोर आलीत. 1 लाख 31 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतनंतर ब्राझील आणि भारतात कोरोनाची सर्वात जास्त प्रकरणं आहेत. संकलन, ंसंपादन - प्रिया लाड
  First published: