लंडन, 02 जुलै : कोरोनाव्हायरसची लस (coronavirus vaccine) कधी येईल याची प्रतीक्षा प्रत्येकाला लागली आहे. मात्र बहुतेकांना कोरोना लशीची गरजच पडणार नाही, तर कोरोना हा सामान्य फ्लूप्रमाणे होईल, लोकांच्या आयुष्याचा एक भाग होईल, असा दावा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या (Oxford University) तज्ज्ञांनी केला आहे.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापिका आणि एपिडेमोलॉजिस्ट सुनेत्रा गुप्ता (Sunetra Gupta) यांनी हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं आहे.
सुनेत्रा गुप्ता म्हणाल्या, "सामान्यत: निरोगी लोक, जे वृद्ध नाहीत, कमजोर नाहीत आणि त्यांना इतर कोणता आजार नाही अशा लोकांना कोरोनाव्हायरसला घाबरण्याची काहीच गरज नाही, हा फ्लूप्रमाणेच असेल. इन्फ्लूएंझापेक्षादेखील या व्हायरसमुळे कमी लोकांचा मृत्यू होईल अशी मला आशा आहे"
"कोरोनाव्हायरसची लस तयार करणं सोप आहे. लवकरच लस चांगली काम करत आहे, याचे पुरावे आपल्याकडे असतील. मात्र जेव्हा लस येईल तेव्हादेखील ती सर्वप्रथम कमजोर आणि जास्त धोका असलेल्या लोकांना दिली जाईल. बाकी लोकांना व्हायरसबाबत चिंता करण्याची गरज नाही. कोरोनाव्हायरसची महासाथ नैसर्गिकरित्या संपेल. हा व्हायरस इन्फ्लूएंझाप्रमाणे लोकांच्या आयुष्याचा भाग होऊन जाईल", असं सुनित्रा यांनी सांगितलं.
हे वाचा - अरे देवा! महाराष्ट्राच्याCovid-19 Task Forceच्या तज्ज्ञ डॉक्टरलाच झाला कोरोना
दरम्यान कोरोनाला रोखण्यासाठी सध्या बहुतेक देशांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र तो पुरेसा नसल्याचं मतही गुप्ता यांनी व्यक्त केलं आहे.
"लॉकडाऊन हा कोरोनाला रोखण्याचा मार्ग आहे, यामुळे आपण कोरोनाला दीर्घकाळ नाही रोखू शकत. काही देशांनी यशस्वीरित्या लॉकडाऊन हाताळलं. मात्र आता त्या देशांमध्ये कोरोनाव्हायरसचं संक्रमण पुन्हा वाढू लागलं आहे. याला कोरोनाव्हायरसची दुसरी लहर म्हटलं जातं आहे, मात्र प्रत्यक्षात पहिलीच लहर वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचते आहे", असं गुप्ता म्हणाल्या.
हे वाचा - पुण्यात कोरोनाचा उद्रेक, जुलैअखेर बाधितांची संख्या जाणार 40 हजारांवर
जगभरात 140 पेक्षा जास्त लशींवर काम सुरू आहे. त्यापैकी 13 लसी क्लिनिकल ट्रायलच्या टप्प्यात आहेत. तर इतर लशी अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहेत. या वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोनावरील लस तयार होईल, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन (Dr. soumya swaminathan) यांनी सांगितल्याचं वृत्त पीटीआयने दिलं होतं.
डॉ. स्वामीनाथन म्हणाल्या, "जवळपास 10 कंपन्यांच्या लशीची मानवी चाचणी सुरू आहे आणि त्यापैकी कमीत कमी तीन कंपन्यांच्या लस अशा टप्प्यापर्यंत पोहोचल्या आहेत, जिथं लशीचा प्रभाव किती आणि कसा आहे हे स्पष्ट होईल"
हे वाचा - घाम आणि दुर्गंधीच नाही तर आता कोरोनालाही शरीरापासून दूर ठेवणार Deodorant
"लस विकसित करणं ही खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि त्याबाबत अनिश्चिततादेखील आहे. मात्र आपल्याकडे अनेक कंपन्या लस तयार करत आहे, ही एक चांगली बाब आहे. आपलं नशीब असेल तर या वर्षाच्या अखेरपर्यंत एक किंवा दोन कंपन्या तरी प्रभावी लस तयार करण्यात यशश्वी होतील, अशी मला आशा आहे", असं त्या म्हणाल्या.
संकलन, ंसंपादन - प्रिया लाड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Coronavirus, Oxford