जाहिरात
मराठी बातम्या / देश / कोरोना वॅक्सीनमध्ये भारताला मोठं यश! 15 ऑगस्टपर्यंत येणार COVID-19ची लस

कोरोना वॅक्सीनमध्ये भारताला मोठं यश! 15 ऑगस्टपर्यंत येणार COVID-19ची लस

कोरोना वॅक्सीनमध्ये भारताला मोठं यश! 15 ऑगस्टपर्यंत येणार COVID-19ची लस

भारतात कोरोना व्हायरसचं थैमान सुरू असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 03 जुलै : भारतात कोरोना व्हायरसचं थैमान सुरू असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. 15 ऑगस्टपर्यंत कोरोनाचं वॅक्सीन येण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. कोरोनाचे 20 हजाराच्या आसपास रुग्ण दरदिवशी वाढत असल्यानं चिंता व्यक्त होत असतानाच आता ही दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. देशात आणखी एका वॅक्सीनला ह्युमन ट्रायल (मानवी चाचणीसाठी) परवानगी देण्यात आली आहे. देशात 5 दिवसांच्या आत क्लिनिकल वापरासाठी शासनाकडून ही मंजुरी मिळालेली दुसरी लस असल्याची माहिती मिळाली आहे. कोरोनाच्या उपचारांसाठी काही औषधे बाजारात आली आहेत, पण उपचारासाठी याची पूर्णपणे हमी दिलेली नाही. अशा परिस्थितीत केवळ कोरोना वॅक्सीनच कोरोनापासून लोकांना वाचवू शकते. ह्युमन ट्रायलनंतर 15 ऑगस्टपर्यंत भारत बायोटेक, ICMR कडून ही लस भारतात लाँच केली जाऊ शकते असाही कयास लावला जात आहे. 7 जुलैला पहिल्यांदा ह्युमन ट्रायल करण्यासाठी परवानगी मिळाली आहे.

News18

COVAXIN असं या लसीचं नाव असू शकेल असंही सांगण्यात येत आहे. दरम्यान कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हे वॅक्सीन कसं काम करणार हे 7 जुलैला पहिल्या ह्युमन ट्रायलनंतर कळू शकणार आहे. आतापर्यंत कोरोनावर 125 हून अधिक वॅक्सीनवर काम सुरू आहे. मात्र त्यापैकी भारतात ह्युमन ट्रायलसाठी परवानगी मिळाली आहे. संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात