मराठी बातम्या /बातम्या /देश /भारतात ओमायक्रोनचा शिरकाव, महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर दोन रुग्ण

भारतात ओमायक्रोनचा शिरकाव, महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर दोन रुग्ण

कोरोनाच्या ओमायक्रोन या नव्या विषाणूने भारतात शिरकाव केल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाटकात दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या दोन जणांना ओमायक्रोनची लागण झाल्याची माहिती वैद्यकीय तपासातून समोर आली आहे.

कोरोनाच्या ओमायक्रोन या नव्या विषाणूने भारतात शिरकाव केल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाटकात दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या दोन जणांना ओमायक्रोनची लागण झाल्याची माहिती वैद्यकीय तपासातून समोर आली आहे.

कोरोनाच्या ओमायक्रोन या नव्या विषाणूने भारतात शिरकाव केल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाटकात दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या दोन जणांना ओमायक्रोनची लागण झाल्याची माहिती वैद्यकीय तपासातून समोर आली आहे.

नवी दिल्ली, 2 डिसेंबर : दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आढळलेल्या कोरोनाच्या ओमायक्रोन (Omicron) या विषाणूने जगभरातील अनेक देशांमध्ये धुमाकूळ घातला आहे. या विषाणूचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक 15 डिसेंबरपर्यंत बंद केली होती. पण अखेर ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट आता घडली आहे. भारतात कोरोनाच्या ओमायक्रोन या नव्या विषाणूने शिरकाव (Omicron enter in India) केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली. ओमायक्रोनने बाधित असलेले दोन्ही रुग्ण हे भारतीय असून ते कर्नाटकातले (Karnataka) रहिवासी आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या (Maharashtra) अगदी उंबरठ्यावर हा विषाणू धडकल्याचं चित्र बघायला मिळतंय.

कोरोनाच्या ओमायक्रोन या नव्या विषाणूने भारतात शिरकाव केल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाटकात दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या दोन जणांना ओमायक्रोनची लागण झाल्याची माहिती वैद्यकीय तपासातून समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे. कर्नाटकात 66 आणि 46 वर्षांच्या दोन व्यक्तींना ओमायक्रोन विषाणूची लागण झाली आहे. दरम्यान, या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली. विशेष म्हणजे जगभरात जे ओमायक्रोनबाधित रुग्ण आढळले आहेत त्यांच्यातदेखील आतापर्यंत सौम्य लक्षणे आढळले असल्याची माहिती समोर आल्याचं अग्रवाल यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा : मोठी बातमी! कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क होणार माफ

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नेमकं काय सांगितलं?

"गेल्या 24 तासात दोन रुग्णांना ओमायक्रोनची बाधा झाल्याचं आमच्या टीमच्या निदर्शनास आलं आहे. या दोघांचे रिपोर्ट काल रात्र उशिरा आली होती. दोन्ही रुग्ण हे पुरुष आहेत. त्यापैकी एकाचं वय हे 66 तर दुसऱ्याचं 46 वर्ष इतकं आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व प्रायमेरी आणि सेकंडरी कॉन्टॅक्ट्सला ट्रेस करण्यात आलं आहे. त्या सगळ्यांची टेस्ट करुन आम्ही त्यांच्याशी कोऑर्डीनेट करतोय", अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

'आमच्याकडे आज सगळ्याच प्रश्नांची उत्तरे नाहीत'

"आमच्याकडे आज सगळ्याच प्रश्नांची उत्तरे नाहीत. पण आणचे वैज्ञानिक आणि डॉक्टर यावर संशोधन करत आहेत. ज्या देशांनी या विषाणूला गांभीर्याने घेतलेलं नाहीय. त्यांच्यावर पुन्हा ते संकट ओढावलं आहे. त्यामुळे आपल्याला आता खूप काळजी घेण्याची गरज आहे. मास्क नियमित वापरायला हवा. या संकटाशी सामना करण्यासाठी विज्ञान आणि तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. दरम्यान, जे दोन नवे रुग्ण सापडले आहेत, त्यांची वैयक्तिक माहिती आम्ही देऊ शकत नाही", असंही आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

हेही वाचा : ममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱ्यानंतर काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग

ओमायक्रोनच्या शिरकावानंतर लसीकरणात काही बदल होणार?

भारतात ओमायक्रोन विषाणूचा शिरकाव झाल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जनतेला लसीकरणाचं आवाहन करण्यात आलं आहे. एनआयटीआय आयोगाचे सदस्य डॉ. विनोद कुमार पॉल यांनी देशभरातील जनतेला लसीकरणाचं आवाहन केलं. दरम्यान, पॉल यांना दोन लसींमध्ये अंतर कमी करण्यात येणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता तर तसं काहीच नियोजन नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे कोरोनाची संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता ज्या नागरिकांनी दोन लसी घेतल्या आहेत त्यांना बुस्टर डोस देणार येणार असल्याची चर्चा देशात आहे. या विषयावरही पॉल यांना विचारण्यात आलं. त्यावर पॉल यांनी बुस्टर डोसवर संशोधन सुरु असल्याची माहिती दिली.

First published: