मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /मोठी बातमी! कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! 10वी आणि 12वीचे परीक्षा शुल्क होणार माफ

मोठी बातमी! कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! 10वी आणि 12वीचे परीक्षा शुल्क होणार माफ

एप्रिलमध्ये उन्हाळ्याची सुटी मिळणार नाही

एप्रिलमध्ये उन्हाळ्याची सुटी मिळणार नाही

आता अशा विद्यार्थ्यांसाठी अजून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई, 02 डिसेंबर: गेल्या दीड वर्षांपासून संपूर्ण भारतात कोरोनाचा (Corona) हाहाकार सुरु आहे. या महामारीमुळे अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर कोरोनामुळे अनेक पालकांचा मृत्यू झाल्यामुळे अनेक लहान मुलं आणि विद्यार्थी (students loss parents in corona) पोरके झाले आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून निरनिराळ्या मदत (facilities to children who lost parents in covid) जाहीर करण्यात आल्या आहेत. तसंच त्यांच्या शिक्षणाची जबाबदारीही घेण्यात आली आहे. त्यात आता अशा विद्यार्थ्यांसाठी अजून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी कोरोनाकाळात आपले पालक गमावले आहेत अशा विद्यार्थ्यांना 2022 म्हणजेच येत्या दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांमध्ये परीक्षा फी  माफ (No fees to board students in Maharashtra) असणार आहे. विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क एक विशेष बाब म्हणून माफ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

अशा विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (SSC), उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (HSC) शुल्क भरण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सदर विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिल्यास त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळा येऊन पुढील वाटचाल खंडीत होण्याची शक्यता आहे. म्हणूनच राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

English Learning Tips: इंग्रजीला घाबरू नका; असं घरबसल्या Free मध्ये शिका इंग्लिश

महाराष्ट्र राज्यातील अशा बाधित विद्यार्थ्यांचे व्यापक हित विचारात घेऊन महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2021-22 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी तसेच इयत्ता बारावी या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या अशा नियमित विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क एक विशेष बाब म्हणून माफ करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.

अनाथ मुलांना सरकारनं केली होती मदत 

कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यातील शेकडो बालके आई वडिलांचे छत्र हरपल्याने अनाथ झाली आहेत. अशा बालकांच्या भविष्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, एकूणच त्यांच्या संरक्षणासाठी काही आर्थिक तरतूद करणे गरजेचे होते, यासाठी महिला बाल विकास विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले होते.

First published:

Tags: School, महाराष्ट्र