11 रुपयांत बचावाची गॅरेंटी देत होता ‘कोरोना बाबा’, पोलिसांनी केली तुरुंगात रवानगी

हा ढोंगी स्वत:ला 'कोरोना बाबा' म्हणत नागरिकांची फसवणूक करीत होता

हा ढोंगी स्वत:ला 'कोरोना बाबा' म्हणत नागरिकांची फसवणूक करीत होता

  • Share this:
    लखनऊ, 15 मार्च : सध्या जगभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अनेकजण या गोष्टीचा गैरवापर करताना दिसत आहे. तर काहींकडून अफवा पसरवल्या जात आहे.  अशाच एका 'कोरोना बाबा'ला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवरही काही लोक त्याचा फायदा घेऊ लागले आहेत. उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी लखनऊच्या वजीरगंज पोलिसांनी सीएमओच्या तक्रारीवरून अहमद सिद्दीकी नावाच्या ढोगी तांत्रिकाला अटक केली आहे. अहमद सिद्दीकी याने त्याच्या दुकानाबाहेर एक फलक लावला होता, ज्यामध्ये असं स्पष्टपणे लिहिलं होतं की, जे लोक मास्क विकत घेऊ शकत नाहीत, त्यांनी त्याच्याकडील सिद्ध केलेलं तावीज विकत घ्यावं. हा ढोंगी बाबा फक्त 11 रुपयांना तावीज विकत होता. त्याने असा दावा केला की, हे तावीज बांधल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही. संबंधित - कोरोनाचा कहर, मुलाने हॉस्पिटलच्या खिडकीतून पाहिलं वडिलांचं शव सीएमओने पोलिसांना ही माहिती दिली. यानंतर वजीरगंज पोलिसांनी फसवणुकीच्या कलमाअन्वये अहमद सिद्दीकीला अटक केली आहे. लखनऊचे अतिरिक्त सीपी (पश्चिम) विकास चंद्र त्रिपाठी यांनी सांगितले की, जवाहर नगर येथील रहिवासी अहमद सिद्दीकी यांच्याबद्दल सीएमओकडून तक्रार आली होती. त्याला फसवणुकीच्या कलमान्वये अटक केली आहे. सीएमओंनी दावा केला आहे की, आरोपी स्वत:ला कोरोना बाबा म्हणत तावीज विकून लोकांची फसवणूक करीत होता. राजधानी दिल्लीत कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका वाढत आहे. शनिवारी लखनऊमध्ये दोन कोरोना रुग्णांची प्रकरणं समोर आली आहे. त्याच वेळी, 11 रूग्णांना विविध रुग्णालयात आयसोलेट करण्यात आलं आहे. सिव्हिल हॉस्पिटल, बलरामपूर हॉस्पिटल, राम मनोहर लोहिया संस्थानमधील चिकित्सकांना ड्युटीवर तैनात ठेवण्यात आले आहे. संशयितांवरही लक्ष ठेवण्यात आलं आहे. मुख्यमंत्री (CM) योगी आदित्यनाथ (Yogi Aadityanath) म्हणाले की, उत्तर प्रदेशात आतापर्यंत कोरोना विषाणूचे 11 रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी सात आग्रा, दोन गाझियाबाद आणि प्रत्येकी एक नोएडा व लखनऊ येथील आहेत. त्यापैकी १० जणांवर दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात तर एक लखनऊमधील केजीएमयू येथे उपचार घेत आहेत. त्याचबरोबर नोएडाच्या एका खासगी कंपनीतील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यानंतर कंपनीच्या 707 कर्मचारी निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहेत. संबंधित - लढा 'कोरोना'शी! पुणेकरांच्या आरोग्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या डॉक्टरांना सॅल्युट
    First published: