लढा 'कोरोना'शी! पुणेकरांच्या आरोग्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या डॉक्टरांना सॅल्युट

महाराष्ट्रात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजेच 31 रुग्णांना या रोगाची लागण झाली आहे. सर्वात जास्त 15 रुग्ण पुण्यात आहेत.

महाराष्ट्रात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजेच 31 रुग्णांना या रोगाची लागण झाली आहे. सर्वात जास्त 15 रुग्ण पुण्यात आहेत.

  • Share this:
    पुणे, 15 मार्च : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा वाढता धोका आणि संसर्ग यामुळे एकीकडे भीतीचं वातावरण असताना डॉक्टरांनी मात्र आपल्या प्रयत्नांची पराकाष्टा करत रुग्णांना बरं करण्यासाठी स्वत:ला त्यात झोकून दिलं आहे. जीवावर उदार होऊन रुग्णांवर उपचार करून त्यांना तातडीनं बरं करण्यासाठी अहोरात्र मेहनत सुरू आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजेच 31 रुग्णांना या रोगाची लागण झाली आहे. सर्वात जास्त 15 रुग्ण पुण्यात आहेत. या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचारी स्वत:च्या जीवावर उदार होऊन काम करत आहेत. त्यांच्या कुटुंबियांना मात्र हुरहुर लागून राहिली आहे. पुणे महानगरपालिकेनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. नायडू रुग्णालयातमध्ये कोरोना ग्रस्तांसाठी एक विशेष कक्ष तयार केले होते. या विभागामध्ये सध्या पालिकेचे 12, सरकारचे 6 आणि ससून रुग्णालयातील 5 डॉक्टरांची टीम कार्यरत आहे.त्यांच्यासोबत जवळपास 40हून अधिक नर्सची टीम मदत करणारी आहे. हे डॉक्टर रुग्ण लवकर बरा व्हावा आणि या संसर्गाचा धोका वाढू नये यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करताना पाहायला मिळत आहेत. हे वाचा-भारतात कोरोना रुग्णांची संख्या शंभरीपार, 4 देशांनंतर आता पाकिस्तान बॉर्डरही सील पुण्यात 311 जणांना देकरेखीखाली ठेवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. लोकांनी कुठलीही माहिती फॉरवर्ड करण्याआधी खात्री करावी. चुकीची माहिती पसरविणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले. आतापर्यंत 8777 घरांचे सर्वेक्षण केलं आहे. ज्यांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्यातल्या फक्त 24 जणांना रुग्णालयात ठेवण्यात आलं असून इतर सर्वांना घरीत एकांतात राहण्यास सांगण्यात आलं आहे अशी माहितीही आयुक्तांनी दिली. नागरीकांनी घाबरण्याचं कारण नाही. काळजी घेणं हा त्यावरचा सर्वात चांगला उपाय आहे असंही ते म्हणाले. पुणे विभागातील इतर चारही जिल्ह्यांमध्ये कोरोनासंबंधीच्या उपाययोजना सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात नजीकच्या काळातील फॉरेन रिटर्न नागरिकांना कॉरनटाईन केलं जाणार आहे . त्यांना काही दिवस आयसोलेट राहण्याच्या सूचना करण्यात आल्याची माहिती म्हैसकर यांनी दिली. राज्यभरात कोरोना व्हायरसमुळे बाधित रुग्णांची संख्या 31 वर पोहोचली आहे. राज्यभरात खबरदारी घेण्यासाठी उपाययोजना सुचवण्यात आली आहे. परंतु, अहमदनगरमध्ये कोरोनामुळे निरीक्षणाखाली असलेले 3 रुग्ण पसार झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील 8 जण हे दुबईला गेले होते. दुबईतून भारतात परतल्यानंतर 8 जणांमध्ये ताप, सर्दी आणि खोकल्यामुळे त्रस्त असल्याचं आढळून आलं होतं. त्यामुळे नगरमधील जिल्हा रुग्णालयातील कोरोना विलगीकरण कक्षामध्ये या 8 ही जणांवर कोरोना व्हायरसचे संशयित म्हणून उपचार सुरू होते. परंतु, हे 8 ही रुग्ण पसार झाले होते. त्यापैकी 5 रुग्ण हे परत आले आहे. अजूनही 3 रुग्ण परत आलेले नाही. हे वाचा-सर्दी, खोकला झाल्यानं गेली दवाखान्यात, चीनमधून आल्याचं सांगताच डॉक्टर झाले गायब
    First published: