कोलकाता 03 ऑक्टोबर : कोलकातामध्ये दुर्गापूजेदरम्यान मोठा वाद निर्माण झाला आहे. इथे ‘महिषासूरा’ ऐवजी पूजा मंडपात महात्मा गांधींसारखा दिसणारा पुतळा बसवण्यात आला होता. त्यातही राष्ट्रपिता यांच्या जयंतीदिनी ही घटना घडल्याने वाद निर्माण झाला. आयोजकांनी सांगितलं की महात्मा गांधी आणि या पुतळ्यातील समानता हा “केवळ योगायोग” आहे. ‘सरकार जाणीवपूर्वक अत्याचार करतंय, कारण..’; गंभीर आरोप करत माओवाद्यांचा PFI ला पाठिंबा दक्षिण-पश्चिम कोलकाता येथील रुबी क्रॉसिंगजवळ अखिल भारतीय हिंदू महासभेच्या पूजेच्या आयोजकांनी पंडाल आणि वादग्रस्त मूर्ती उभारली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांच्या सूचनेनुसार गांधीसारख्या दिसणाऱ्या मूर्तीमध्ये बदल करण्यात आले आणि त्यावर केस तसंच मिशा लावण्यात आल्या. पौराणिक कथेनुसार, दुर्गा देवीने महिषासुराचा वध दुष्टशक्तीचा अंत करण्यासाठी केला.
After row the Hindu Mahasabha of West Bengal has put hair and moustache on Asura which was originally Mahatma Gandhi’s look alike. Last night people gave inflammatory speech by saying “Gandhi can’t be father of the nation.”
— Sayantan Ghosh (@sayantan_gh) October 3, 2022
Here Before and After Pic. #HinduMahasabha #WestBengal pic.twitter.com/9QMVlEUZTf
आदल्या दिवशी एका पत्रकाराने कोलकाता पोलिसांना टॅग करत दुर्गा मूर्तीचं छायाचित्र ट्विट केलं होतं. यात महिषासूराऐवजी गांधींसारखा दिसणारा पुतळा उभा केल्याचं पाहायला मिळालं. मात्र, सणाच्या काळात तणाव निर्माण करण्याच्या पोलिसांच्या सूचनांचा हवाला देत नंतर ही पोस्ट सोशल मीडियावरून काढून टाकण्यात आली. पुरातत्त्व विभागाला सापडली हजारो वर्षं जुनी मंदिरं अन् लेणी; अनेक रहस्यमय गोष्टींचा शोध नंतर “पोलिसांनी आम्हाला त्या मूर्तीमध्ये बदल करण्यास सांगितलं आणि आम्ही ते स्वीकारलं. आम्ही महिषासुरच्या मूर्तीवर मिशा आणि केस लावले आहेत.” असं सांगितलं गेलं. तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या राजकीय पक्षांनीही ‘महिषासुर’ऐवजी गांधींजींचा पुतळा वापरला गेल्याने या प्रकाराची निंदा केली.