मराठी बातम्या /बातम्या /देश /'दबाव टाकला जातोय', ऑक्सिजन खरेदीवरुन शिवराज सिंह चौहानांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

'दबाव टाकला जातोय', ऑक्सिजन खरेदीवरुन शिवराज सिंह चौहानांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

मध्य प्रदेशनं महाराष्ट्रातील निर्माता कंपन्यांकडे ऑक्सिन कॉन्सनट्रेटरची (Oxygen Concentrator) ऑर्डर दिली होती, मात्र राज्य सरकारनं (Maharashtra government) टाकलेल्या दबावामुळे ती ऑर्डर पाठवण्यात आली नाही, असं चौहान यांनी म्हटलं.

भोपाळ 18 एप्रिल : कोरोनाचं (Corona) संकट झपाट्यानं वाढत असतानाच आता राज्यांमधील एकमेकांवरील आरोपांचं सत्र आणखीच वाढताना दिसत आहे. अशात आता मध्य प्रदेश सरकारनं (MP government) महाराष्ट्रावर मोठा आरोप केला आहे. कोरोनाबाबत चर्चेसाठी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत असं सांगण्यात आलं, की मध्य प्रदेशनं महाराष्ट्रातील निर्माता कंपन्यांकडे ऑक्सिन कॉन्सनट्रेटरची (Oxygen Concentrator) ऑर्डर दिली होती, मात्र राज्य सरकारनं (Maharashtra government) टाकलेल्या दबावामुळे ती ऑर्डर पाठवण्यात आली नाही. सरकारचा असा आरोप आहे, की महाराष्ट्र सरकार मध्य प्रदेशात कॉन्सनट्रेटर न पाठवण्यासाठी दबाव टाकत आहे.

मध्य प्रदेशात सध्या 2000 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर आले आहेत, तर 650 कॉन्सनट्रेटर अजून येणार आहेत. 1300 कॉन्सनट्रेटर जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांनी खरेदी केले आहेत. मात्र, सरकार महाराष्ट्राकडूनच कॉन्सनट्रेटर विकत घेत आहे. अशात आता महाराष्ट्रातून ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मिळणं अवघड होत असल्याचं चित्र आहे. याचं एक मुख्य कारण महाराष्ट्रात झपाट्यानं होत असलेला कोरोना प्रसारही सांगितलं जात आहे.

राज्याला remdesivir देणाऱ्या फार्मा कंपनीच्या संचालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

दुसरीकडे हरिद्वार कुंभवरुन परतणाऱ्यांमध्ये कोरोना रुग्ण आढळत असल्यानं मध्य प्रदेश सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. गृह विभागानं सर्व जिल्ह्यांना आदेश दिला आहे, की हरिद्वार कुंभवरुन परतणाऱ्या लोकांना शोधून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात यावं. गृह विभागानं आपल्या आदेशात म्हटलं आहे, की जे लोक हरिद्वार कुंभहून परतले आहेत, त्यांना जिल्हा प्रशासनाला याबद्दलची माहिती देऊन होम क्वारंटाईन व्हावं. स्थानिक लोकही याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाला देऊ शकतात. यानंतर जिल्हा प्रशासन स्तरावर अशा लोकांची ओळख पटवून त्यांना होम क्वारंटाईन केलं जाईल.

First published:
top videos

    Tags: Corona, Shivraj singh chauhan, Uddhav thackeray