मध्यप्रदेश, 26 नोव्हेंबर: मध्य प्रदेशातल्या (Madhya Pradesh) जबलपूरमधून एक आगळीवेगळी बातमी समोर येतेय. जबलपूरमध्ये (Jabalpur) एका पोपटावर बक्षीस ठेवण्यात आलं आहे. त्याला शोधून काढणाऱ्याला 15 हजार रुपये दिले जातील. हे बक्षीस एका सॉफ्टवेअर इंजिनीअरनं ठेवलं आहे. बिट्टू नावाचा हा पोपट (parrot) दोन वर्षांपासून इंजिनिअरच्या घरी राहत होता. मात्र तो पोपट आता बेपत्ता झाला आहे. त्याच्या बेपत्ता झाल्यानं संपूर्ण कुटुंब दु:खात आहे.
बेपत्ता असलेला बिट्टू पोपट घरातील लोकांच्या आवाजाची नक्कल करत असायचा. तो स्वतः पिंजरा उघडायचा. सॉफ्टवेअर इंजिनिअरने पोपट शोधणाऱ्याला 15 हजार रुपयांचे बक्षीस देण्याचं म्हटलं आहे. यानंतर 15 जणांनी फोन करून पोपट आपल्या जवळ असल्याचे सांगितलं. पण इंजिनियरने पोपट पाहिला तेव्हा तो बिट्टू नव्हता.
हेही वाचा- जन्मजात बाळाला दोन डोकं, निर्दयी आईनं रुग्णालयातून काढला पळ
रांझी मानेगाव येथील रहिवासी असलेले अमन चौहान हे बंगळुरू येथील एका सॉफ्टवेअर कंपनीत इंजिनिअर आहेत. त्यांचे वडील श्यामवीर चौहान लष्करात आहेत. कोविडपासून अमन घरून काम करत आहे. अमनच्या म्हणण्यानुसार, दोन वर्षांपूर्वी बिट्टू त्यांच्या घरचा सदस्य झाला, तेव्हा तो दोन महिन्यांचा होता. पण हा पोपट 2 नोव्हेंबरपासून बेपत्ता आहे.
त्यांनी 3600 रुपयांना दोन पोपट विकत घेतले होते. काही दिवसानंतर एकाचा मृत्यू झाला. बिट्टू वाचला होता. बिट्टू एक प्रकारे माझा मित्रच झाला होता. तो आमच्यासोबत खेळायचा. काही वेळानं तो पिंजरा उघडायला शिकला होता. अनेकदा तो पिंजरा उघडून खोलीत आणि व्हरांड्यात मजा करायचा.
2 नोव्हेंबर रोजी बेपत्ता झाला
2 नोव्हेंबर रोजी बिट्टू बेपत्ता झाला. त्याचा पिंजरा उघडा होता. पिंजरा उघडल्यानंतर तो बाहेर गेला असावा, अशी भीती व्यक्त होत आहे. तेव्हापासून अमन आणि त्याचे कुटुंबीय आपल्या लाडक्या बिट्टूचा शोध घेत आहेत. बिट्टू त्यांच्या कुटुंबाचा सदस्य झाला होता. आजूबाजूच्या प्रत्येक घरात त्याचा शोध घेतला. यानंतर बिट्टूच्या जुन्या फोटोच्या आधारे हे पत्रक छापून संपूर्ण शहरात वितरित करण्यात आलं.
हेही वाचा- Cold Drink मध्ये गुंगीचं औषध टाकून पुण्यातील तरुणीवर बलात्कार; वर्षभरापासून सुरू होता भयंकर प्रकार
अमननं पत्रकात बिट्टूचा शोध घेणाऱ्याला 15 हजार रुपयांचे बक्षीस देण्याचं लिहिलं आहे. पोपटासाठी कोणी 15 हजार देण्यास तयार आहे, असे पत्रक पाहून लोकांना धक्का बसला. गेल्या 21 दिवसांपासून अमन यांचे कुटुंबीय बिट्टूचा शोध घेत आहे.
बक्षीसाची बातमी मिळताच फोन कॉल्सचा सपाटा
हरवलेल्या पोपटाचा शोध घेण्यासाठी 15 हजार रुपये मिळण्याची जाहिरात पाहून लोकांचे फोन येऊ लागले असल्याचं अमन यांनी सांगितलं. अनेकांनी त्याला दुसरा पोपट दाखवला आहे. मात्र त्यांचा बिट्टू सापडला नाही. आतापर्यंत 15 हून अधिक लोकांचे फोन आले आहेत. मात्र अमन आणि त्यांचे कुटुंबीय निराश आहेत की, त्यांचा बिट्टू त्यांना परत कधी मिळेल याची ते वाट पाहात आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Madhya pradesh