नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर : नांदेडमधील देगलूर विधानसभा निवडणुकीत (deglur bypoll election) काँग्रेसचे (congress) नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (ashok chavan) यांनी भाजपला (bjp) चांगलीच धूर चाळली. देगलूरच्या पराभवामुळे भाजपला बॅकफुटवर जावे लागले. त्यानंतर आज अशोक चव्हाण यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadakari) यांची भेट घेतली. या भेटीमुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची दिल्लीत बैठक झाली. नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. यावेळी अशोक चव्हाण आणि गडकरी यांच्यात नांदेड शहरातील विकासकामांवर चर्चा झाली. या बैठकीनंतर अशोक चव्हाण यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
देगलूर मतदारसंघातील विजयी उमेदवार जितेश अंतापूरकर यांची केंद्रीय नेत्यांशी उद्या भेट होणार आहे. नांदेड ते हैदराबाद ग्रीन फिल्ड रस्ता आहे, या संदर्भात नितीन गडकरी यांच्यासोबत चर्चा केला आहे. औरंगाबाद-पुणे या रस्त्याबाबत चर्चा केली आणि मराठवाड्यातील बुलेट ट्रेनसाठीही विनंती केली, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.
सूर्यास्तानंतरही होणार पोस्टमॉर्टेम, मोदी सरकारने बदलला ब्रिटीशकालीन नियम
तसंच, मराठवाड्याच्या विकासकामांबद्दल चर्चा केली असून नितीन गडकरी पॉझिटिव्ह आहेत, ते योग्य निर्णय घेतील असा आम्हाला विश्वास आहे, असंही चव्हाण म्हणाले.
'राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर प्रज्ञा सातव यांना संधी देण्यात आली आहे. त्या या जागेवर निवडून येतील', असंही चव्हाण म्हणाले.
335 दिवस! T20 World Cup Final गमावल्यानंतर नीशमचं ट्वीट, काय आहे अर्थ?
नवाब मलिक यांनी त्रिपुरा हिंसाचारावरून भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहे. याबद्दल पत्रकारांनी विचारले असता, अशोक चव्हाण म्हणाले की, 'राजकारणाचा स्तर घसरू नये. राज्यात दंगलीच्या घटना घडल्या, ही बाब गंभीर आहे. या गोष्टी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करावी लागते. म्हणून कारवाई केली'
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंच्या जयंती दिनी सत्ताधारी नेते उपस्थित नाही, ही खेदाची बाब आहे. ही नवी परंपरा या सरकारने सुरू केली आहे, अशी टीकाही चव्हाण यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.