मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /335 दिवस! T20 World Cup Final गमावल्यानंतर नीशमचं ट्वीट, काय आहे अर्थ?

335 दिवस! T20 World Cup Final गमावल्यानंतर नीशमचं ट्वीट, काय आहे अर्थ?

टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये (T20 World Cup Final) ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा (Australia vs New Zealand) 8 विकेटने पराभव केला. या पराभवानंतर न्यूझीलंडचा ऑलराऊंडर जेम्स नीशम (James Neesham) याचं ट्वीट व्हायरल झालं आहे.

दुबई, 15 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये (T20 World Cup Final) ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा (Australia vs New Zealand) 8 विकेटने पराभव केला. ऑस्ट्रेलियाचा हा पहिलाच टी-20 वर्ल्ड कप विजय आहे, याआधी कांगारूंनी 5 वनडे वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं होतं. न्यूझीलंडची मात्र पहिला वर्ल्ड कप जिंकण्याची प्रतिक्षा अजून कायम आहे. फायनलमध्ये न्यूझीलंडने पहिले बॅटिंग करत 4 विकेट गमावून 172 रन केले. कर्णधार केन विलियमसनने (Kane Williamson) 48 बॉलमध्ये 10 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने 85 रनची खेळी केली. यानंतर ऑस्ट्रेलियाने 18.5 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून हे आव्हान पार केलं. मिचेल मार्शने (Mitchell Marsh) 50 बॉलमध्ये 6 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीने नाबाद 77 रनची खेळी केली. वॉर्नरने (David Warner) 38 बॉलमध्ये 55 रन केले, यामध्ये 4 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता.

न्यूझीलंडला तिसऱ्यांदा फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. टी-20 वर्ल्ड कप फायनलआधी न्यूझीलंडचा 2019 वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध आणि 2015 वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावं लागलं होतं.

टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर न्यूझीलंडचा ऑलराऊंडर जेम्स नीशम (James Neesham) याचं ट्वीट व्हायरल झालं आहे. अनेक जण नीशमच्या या ट्वीटचा वेगवेगळा अर्थ काढत आहेत. नीशमने मागच्या दोन वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडला फायनलमध्ये पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. नीशमने आपल्या ट्वीटमध्ये 335 दिवस असं लिहिलं. ऑस्ट्रेलियात होणारा पुढचा टी-20 वर्ल्ड कप 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबरदरम्यान खेळवला जाईल. पुढच्या टी-20 वर्ल्ड कपला 335 दिवस राहिल्याचं नीशमने त्याच्या या ट्वीटमधून सुचवलं.

Jimmy neesham tweet

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलमध्ये नीशमने 7 बॉलमध्ये 1 सिक्सच्या मदतीने नाबाद 13 रन केले. नीशमने न्यूझीलंडकडून 12 टेस्ट, 66 वनडे आणि 36 टी-20 मॅच खेळल्या. नीशमच्या नावावर दोन टेस्ट शतकं आणि 4 अर्धशतकांसह 709 रन आहेत. याशिवाय वनडेमध्ये त्याने 6 अर्धशतकांसह 1,320 रन केले. टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये नीशमने 410 रन केले, यामध्ये 6 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने टेस्टमध्ये 14, वनडेमध्ये 68 आणि टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 21 विकेट घेतल्या आहेत.

First published:
top videos

    Tags: New zealand, T20 world cup