नवी दिल्ली 7 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. उत्तर प्रदेशातील उन्नाव मतदारसंघातून अन्नू टंडन यांचं नाव जाहीर झालं आहे. हा मतदारसंघ गेली चार वर्षं सतत चर्चेत असणारा भाग आहे. दलितांवर झालेल्या अत्याचार प्रकरणामुळे हा भाग चर्चेत होता. शिवाय भाजपचे विद्यमान खासदार साक्षी महाराज हेसुद्धा वारंवार वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत असतात. काँग्रेसच्या अन्नू टंडन या उद्योजिका असून त्यांची 42 कोटींची मालमत्ता त्यांनी मागील निवडणुकीच्या वेळी जाहीर केली होती. उन्नाव हा देशातला सर्वांत मोठा लोकसभा मतदारसंघ आहे. आता साक्षी महाराज आणि अन्नू टंडन यांच्याली टक्कर रंगणार आहे. पण या दोघांनाही मोठं आव्हान असेल बसप आणि सपा यांच्या आघाडीचं. कोण कुठून लढणार? ही आहे काँग्रेसची पहिली यादी Loksabha Election 2019 काँग्रेसची 15 उमेदवारांची घोषणा, राहुल आणि सोनिया गांधींचा समावेश सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची नावे अनुक्रमे रायबरेली आणि अमेठी या मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे घोषित झाली आहेत. याशिवाय उत्तर प्रदेशचे 11 आणि गुजरातचे 4 उमेदवार या पहिल्या यादीत आहेत. काय होती 2014 ची परिस्थिती? नरेंद्र मोदी आणि भाजपच्या लाटेमध्ये 2014च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसचा धुव्वा उडाला. अन्नू टंडन याच त्या वेळीही काँग्रेसच्या उमेदवार होत्या. भाजपच्या साक्षी महाराजांनी ही जागा सहज खिशात घातली. एवढंच नाही तर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारालाही अन्नू टंडन यांच्यपेक्षा जास्त मतं मिळाली होती आणि त्या थेट चौथ्या स्थानावर फेकल्या गेल्या. असं असूनही काँग्रेसने पुन्हा एकदा अन्नू टंडन यांच्यावरच विश्वास दाखवला आहे. 2004 ते 2014 पर्यंत काय झालं? 2004 मध्ये ही उत्तर प्रदेशातली ही जागा काँग्रेसकडे होती. 2009मध्ये पहिल्यांदा अन्नू टंडन यांना उमेदवारी देण्यात आली. त्या वेळी त्या या जागेवरून निवडून आल्या आणि खासदार झाल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.