कोण कुठून लढणार? ही आहे काँग्रेसची पहिली यादी

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 7, 2019 09:40 PM IST

कोण कुठून लढणार? ही आहे काँग्रेसची पहिली यादी

07 मार्च : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने पहिल्या 15 उमेदवारांचे नाव घोषित केले आहे. या यादीत गुजरातमधील 4 तर उत्तर प्रदेशमधील 11 जागांचा समावेश आहे. यामध्ये काँग्रेसच्या माजीअध्यक्षा सोनिया गांधी या रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहे. तर राहुल गांधी हे अमेठीतून निवडणूक लढवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील वडोदा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांचा हा पारंपारिक मतदारसंघ आहे. काँग्रेसकडून त्यांच्याविरोधात प्रशांत पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रशांत पटेल हे 1997 ला एमएस विद्यापीठाचे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते. 2015 मध्ये त्यांची बडोदामधून काँग्रेस शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. पटेल यांच्या कारकिर्दीतच स्थानिक पालिका निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी मात्र निराशाजनक होती. परंतु, पटेल हे पाटीदार समुहाचे नेते म्हणून ओळखले जातात. गुजरातमधील पाटीदार समुहांची लोकसंख्या पाहता पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

ही आहे काँग्रेसच्या 15 उमेदवारांची पहिली यादी

सोनिया गांधी - रायबरेली, उत्तर प्रदेश

राहुल गांधी - अमेठी, उत्तर प्रदेश

इम्रान मसूद - सहारनपुर, उत्तर प्रदेश

Loading...

सलीम इकबाल शेरवानी - बदायूं, उत्तर प्रदेश

जितिन प्रसाद - धौरहरा, उत्तर प्रदेश

अन्नू टंडन - उन्नाव, उत्तर प्रदेश

सलमान खुर्शीद - फर्रुखाबाद, उत्तर प्रदेश

राजाराम पाल - अकबरपूर, उत्तर प्रदेश

ब्रिज लाल खबरी- जालौन, उत्तर प्रदेश

निर्मल खत्री - फैजाबाद, उत्तर प्रदेश

आर.पी. एन. सिंग - कुशी नगर, उत्तर प्रदेश

राजू परमार - पश्चिम अहमदाबाद, गुजरात

भारतसिंह सोलंकी - आनंद, गुजरात

प्रशांत पटेल - वडोदरा, गुजरात

रणजीत मोहनसिंग रतवा - छोटा उदयपूर, गुजरात

तारखांची होणार लवकरच घोषणा

देशातलं राजकीय वातावरण तापलं आहे. प्रचार सभांची सुरूवातही झाली आहे. असं वातावरण असताना निवडणुकांच्या तारखांची घोषणा केव्हा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणं अपेक्षीत होतं. मात्र, भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या तणावामुळे त्यात थोडा उशीर होण्याची शक्यता आहे. आता 7 ते 10 मार्चच्या दरम्यान निवडणूक आयोगाकडून या तारखा घोषित होण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाने अनेक राज्यांमध्ये जाऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला आहे. आयोगाची गेले काही महिने जोरदार तयारी सुरू होती. त्यामुळे या तारखांची आता केव्हाही घोषणा होऊ शकते. ही शक्यता लक्षात घेऊनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यक्रमांच्या उद्घाटनांचा आणि भूमिपूजनांचा धडाका लावला आहे.

तर तारखा जाहीर होण्यास उशीर होत असल्याने काँग्रेससहीत काही राजकीय पक्षांनी आयोगावर टीकाही केली होती. पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभा होईपर्यंत आयोग वाट पाहत आहे का? अशी टीका काँग्रेसने केली होती. 2018 मध्ये झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित करण्यावरूनही वाद झाला होता.

लोकसभेच्या निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम, अरूणाचल प्रदेश या राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. तर जम्मू आणि काश्मीर विधानसभेच्या निवडणुका घेण्याचाही सरकार विचार करत आहे.

------------------------

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 7, 2019 09:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...