जाहिरात
मराठी बातम्या / देश / धक्कादायक! ग्रीन झोन होत आहेत रेड झोन, 9 दिवसांत 'या' 20 जिल्ह्यांत 283 नवीन प्रकरणं

धक्कादायक! ग्रीन झोन होत आहेत रेड झोन, 9 दिवसांत 'या' 20 जिल्ह्यांत 283 नवीन प्रकरणं

धक्कादायक! ग्रीन झोन होत आहेत रेड झोन, 9 दिवसांत 'या' 20 जिल्ह्यांत 283 नवीन प्रकरणं

देशात 130 जिल्हे रेड, 284 ऑरेंज आणि 319 जिल्हे ग्रीन झोन करण्यात आले आहेत. मात्र गेल्या काही आठवड्यांमधील आकड्यांनी सरकारची चिंता वाढली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 10 मे : कोरोनाचा (Coronavirus) प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र लॉकडाऊनमध्येही कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं 30 एप्रिल रोजी देशातील सर्व जिल्ह्यांची एक लिस्ट जारी करण्यात आली होती. यात 130 जिल्हे रेड, 284 ऑरेंज आणि 319 जिल्हे ग्रीन झोन करण्यात आले आहेत. मात्र गेल्या काही आठवड्यांमधील आकड्यांनी सरकारची चिंता वाढली आहे. सरकारच्या वतीनं ग्रीन झोन असलेल्या परिसरात काही प्रमाणात शिथीलता देण्यात आली आहे. मात्र ग्रीन झोन असलेल्या 20 जिल्ह्यांमध्ये संक्रमणाची नवीन प्रकरणं दिसत आहेत. दिल्लीतील एम्सच्या वरिष्ठ डॉक्टरांनी येत्या काही दिवसांत ग्रीन झोनचं रेड झोन होतील, अशी शक्यता वर्तवली आहे. संक्रमणाची सर्वात जास्त प्रकरणे त्रिपुरातील ग्रीन झोन जिल्ह्यांमधून समोर आली आहे. त्यानंतर ओडिशातील कित्येक राज्यांमध्ये नवीन प्रकरणे मिळाली आहे. पंजाबमध्येही अशीच परिस्थिती आहे. या ग्रीन झोन जिल्ह्यांत मिळाली सर्वात जास्त प्रकरणे ज्या जिल्ह्यांना ग्रीन झोन घोषित केले गेले, तेथे एका आठवड्यात संक्रमणाची नवीन प्रकरणं पाहायला मिळाली. महाराष्ट्रातील सिंधूदुर्ग जिल्ह्यात 2, तर सर्वाधिक त्रिपुराच्या धलाई, ओडिशाच्या गंजम जिल्ह्यात 47, ओडिशाच्या जगतपूरमधील 05, ओडिशामधील मयूरभंज, बालांगीर, कटक, झारसुगुडामध्ये 2-2. पंजाबमधील बठिंडा आणि फतेहगड येथून 37-37, पंजाबमधील फाजिल्का येथे 20, पश्चिम बंगालच्या बीरभूम येथे 6, गुजरातमधील देवभूमी येथे 02 या ग्रीन झोनमध्ये सर्वात जास्त प्रकरणं सापडली आहे. वाचा- सरकारकडून गरिबांना गिफ्ट! 1 जूनपासून देशातील कोणत्याही भागातून खरेदी करा रेशन प्रत्येक आठवड्यात तयार होणार लिस्ट आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की दर आठवड्याच्या आकडेवारीचा आढावा घेतल्यानंतर जिल्ह्यांची झोननिहाय यादी तयार केली जाईल. या कामासाठी, तज्ञांची टीम प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेणार आहे. वाचा- डॉक्टरांना सर्वात मोठं यश! ‘ही’ तीन औषधं वापरून 7 दिवसांत बरा झाला कोरोना रुग्ण वाचा- महाराष्ट्रानं वाढवली मोदी सरकारची चिंता, ‘या’ 5 शहरांमध्ये परिस्थिती चिंताजनक संपादन, संकलन-प्रियांका गावडे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: corona
  • First Published :
जाहिरात
जाहिरात