चेन्नई, 10 मे : बेकरी मालकानं वादग्रस्त जाहिरात दिल्यामुळं सध्या चेन्नईतील एक प्रकरण गाजत आहे. चेन्नईमध्ये बेकरी मालकानं मुस्लिमांविरूद्ध जाहिरात प्रसिद्ध केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या आरोपाखाली मालकाला अटकही करण्यात आली आहे. या मालकानं, आमच्या दुकानात मुस्लीम नाही तर जैन लोकं पदार्थ तयार करतात, अशी जाहिरात केली होती. त्यामुळं जैन बेकरी आणि कन्फेक्शनरीच्या मालकावर 295 अ अंतर्गत (कोणत्याही वर्गाच्या धार्मिक भावनांचा त्याच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धेचा हेतूपूर्वक अपमान करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. याशिवाय आयपीसीच्या कलम 504 (शांततेचा भंग) अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? चेन्नईच्या टी. नगरातील महालक्ष्मी स्ट्रीटवर जैन बेकरीचे हे दुकान आहे. असा आरोप केला जातो की त्याने आपली बेकरीची जाहिरात करण्यासाठी मालकानं पत्रकं छापली. ज्यामध्ये त्यांनी असा दावा केला आहे की त्यांच्या बेकरीत मुस्लीम लोकं पदार्थ तयार करत नाहीत. त्या जाहिरातीवर लिहिले होते की, ‘येथे जैन लोकांना तयार केलेले पदार्थ आहेत, मुस्लीम कर्मचाऱ्यांनी नाही’. या जाहिरातीनंतर त्यांच्यावर धर्माचा अनादर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. वाचा- कोरोना हरणार, भारत जिंकणार; व्हायरसवर मात केलेल्या रुग्णांमुळे आशा पल्लवित
वाचा- 25 हजारांत 1 लाख लिटर दारू, भामट्यांनी घरीच सुरु केला होता गोरखधंदा! बेकरी मालकाला अटक ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चेन्नईच्या महाबळम पोलिसांनी याची दखल घेतली. त्यानंतर जैन बेकरीच्या मालकास अटक केली गेली. असा मुद्दा असा आहे की त्याने मुद्दाम अशी जाहिरात मुस्लिमांविरूद्ध प्रसिद्ध केली गेली. जैन बेकरी व कन्फेक्शनरी मालकाविरूद्ध कलम 295 अ आणि 504 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अफवा टाळण्यासाठी केली होती जाहिरात बेकरीताल कर्मचाऱ्यांनी सांगितले की, या जाहिरातीमागे जातीय दंगल पसरविण्याचा कोणताही हेतू नव्हता. त्याऐवजी त्यांचा असा तर्क आहे की अशी जाहिरात प्रसिद्ध केली गेली होती कारण लोक या बेकरीबद्दल येथे अफवा पसरवत होते की येथे वस्तू खरेदी करू नका कारण मुस्लीम येथे तयार करतात. वाचा- सारा अली खानचं वजन एकेकाळी होतं 95 किलो; अशी झाली ‘फॅट टू फिट’, पाहा VIDEO

)







