मुंबई, 10 मे : कोरोना व्हायरसमुळे सध्या सगळीकडे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे इतर सेलिब्रेटींप्रमाणे सारा अली खान सुद्धा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. जे सोशल मीडियावर खूप चर्चेत असतात. पण या सर्वात सारा तिच्या फिटनेसबाबात सुद्धा फार गंभीर असल्याचं दिसून येतं. त्यामुळे सध्या लॉकडाऊन असताना ती घरच्या घरी वर्कआउट करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं भाऊ इब्राहिमसोबत काही फोटो शेअर केले होते. त्यानंतर तिनं आता एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिनं आपलं वाढलेलं वजन कसं कमी केलं हे सांगितलं आहे. सारा अली खाननं तिच्या इन्स्टाग्राम एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती जिममध्ये घाम गाळताना दिसत आहे. अर्थात हा थ्रोबॅक व्हिडीओ आहे. मात्र साराच्या हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. एवढंच नाही तर बॉलिवूड सेलिब्रेटी सुद्धा तिच्या या व्हिडीओवर खूप इंप्रेस आहेत. या व्हिडीओमध्ये सारा Pull-Up करताना दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिनं एक मोटिव्हेशनल कॅप्शन लिहिलं आहे.
याशिवाय या अगोदर सारानं तिच्या इन्स्टाग्रामवर भाऊ इब्राहिमसोबत काही फोटो शेअर केले होते. ज्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल सुद्धा केलं गेलं होतं. अर्थात लोकांनी तिच्या तोकड्या कपड्यांवरून तिला ट्रोल केलं होतं. मात्र साराच्या चाहत्यांना तिचा हा अंदाज सुद्धा खूप पसंत पडला होता. रमजानच्या महिन्या असे कपडे घातल्यानं साराला ट्रोल करण्यात आलं होतं.
सारानं याआधीही तिच्या वर्कआउटचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंवरून ती नेहमीच तिच्या चाहत्यांना फिटनेसबाबत मोटिव्हेट करताना दिसते. एक वेळ अशी होती जेव्हा साराचं वजन तब्बल 95 किलो एवढं होतं. मात्र प्रचंड मेहनत करून तिनं हे वजन कमी केलं.

)







