जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 25 हजारांत 1 लाख लिटर दारू, भामट्यांनी घरीच सुरु केला होता गोरखधंदा!

25 हजारांत 1 लाख लिटर दारू, भामट्यांनी घरीच सुरु केला होता गोरखधंदा!

25 हजारांत 1 लाख लिटर दारू, भामट्यांनी घरीच सुरु केला होता गोरखधंदा!

लॉकडाऊनमध्ये दारू विक्रीवर बंदी असताना शहराच्या मध्यभागी हा अड्डा कसा सुरू होता?

  • -MIN READ
  • Last Updated :

बीड, 10 मे: बीड पोलिसांनी रविवारी सकाळी शहराच्या मध्यभागी असलेल्या पाथरूड गल्लीत हातभट्टीच्या अड्ड्यावर धाड टाकून सुमारे 25 हजार लिटर रसायन नष्ट केलं. या रसायनापासून सुमारे 1 लाख लिटर गावठी दारू तयार करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लॉकडाऊनच्या काळात पाथरूड गल्लीत ही कारवाई झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे नागरी वस्तीत एका घरात हा गोरखधंदा सुरु होता. लॉकडाऊनमध्ये दारू विक्रीवर बंदी असताना शहराच्या मध्यभागी हा अड्डा कसा सुरू होता, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हेही वाचा… मी खरं प्रेम केलं. . आज तुली सोडून जात आहे! असं लिहून तरुणानं घेतला गळफास या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक बळवंत मोरे यांनी दिली आहे. तसेच शहरात आणखी अशा अवैध दारू सुरू आहेत का, याबाबतीतही तपासणी केली जात आहे. 25000 मध्ये 1 लाख लिटर दारू… शहरात मोठ्या प्रमाणात गावठी दारू तयार केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रविवारी सकाळी 6 वाजता धडक करवाई केली. हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त केला. पोलिसांनी दारू बनवण्याचं साहित्य ताब्यात घेतलं आहे. तसेच त्याबरोबरच याठिकाणी 25000 लिटर रसायन नष्ट करण्यात आलं. पोलिसांनी हे रसायन गटारीत फेकलं. 25000 लिटर रसायनापासून सुमारे 1 लाख लिटर दारू बनवली जात होती, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं आहे. हेही वाचा… परप्रांतीय मजुरांसमोर भाकरीचा प्रश्न! पुणे जिल्हा प्रशासनाने घेतला महत्त्वपूर्ण अवैध दारुमुळे लोकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे, थांबवावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करत आहेत लोकांच्या कालावधी दारूविक्री बंद असताना अशा हातभट्ट्या सुरू कशा होतात, याला प्रशासनातील कोणाचा अभय तर नाही ना, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात