नवी दिल्ली, 10 मे : भारतात (India) कोरोनाव्हायरस (coronavirus) रुग्णांचा आकडा जितक्या झपाट्यानं वाढतो आहे, तितक्याच गतीनं कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही (corona patient recovery rate) आहे. त्यामुळे भारत कोरोनाव्हायरसचा लढा जिंकणार अशा आशा पल्लवित झाल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (health ministry) दिलेल्या माहितीनुसार देशातील कोरोना रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण म्हणजे रिकव्हरी रेट 29.36 टक्के झालं आहे. याचा अर्थ प्रत्येकी 3 पैकी एक रुग्ण बरा झाला आहे. हे वाचा - पुणे, मुंबईत कोरोनाचं कम्युनिटी ट्रान्समिशन तर नाही ना? ICMR करणार तपासणी देशभरातील रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी 1 लाख 30 हजारपेक्षा जास्त बेडची व्यवस्था करण्यात आली होती, मात्र त्यापैकी फक्त 2 हजार म्हणजे जेमतेम 1.5 टक्के बेड्सचाच वापर करण्यात आला आहे. कोरोनाचं संक्रमण पाहता बहुतेक रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता आणि ओपीडी बंद करण्यात आली होती. एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, आम्ही कोरोनासंबंधी आधीच तयारी केली होती, ज्याचा परिणाम आता पाहायला मिळतो आहे. हे वाचा - ‘मुस्लीम व्यक्ती पदार्थ तयार करत नाहीत, तर…’, वादग्रस्त जाहिरातीप्रकरणी बेकरी मालकाला अटक कोरोना रुग्णांची संख्या जरी वाढत असली, तरी त्यांच्यामध्ये दिसणारी कोरोना लक्षणं सामान्य आहेत. कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यानं रुग्णांचं ठीक होण्याचं प्रमाण वाढत आहे. ज्या पद्धतीनं कोरोना संक्रमित रुग्णांची देखभाल केली जाते आहे, ते पाहता लवकरच देशातील कोरोनाचा ग्राफ खाली येताना दिसेल, असं सांगितलं जातं आहे. त्यामुळे आता या बेड्सचा वापर नॉन कोविड रुग्णांसाठी करण्याचा विचार केला जातो आहे. देशात सध्या कोरोनाव्हायरसची 62939 प्रकरणं आहेत, त्यापैकी 19358 रुग्ण बरे झालेत. 2109 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. संकलन, संपादन - प्रिया लाड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







