बेंगळुरू, 05 मार्च: महिलेला नोकरी देण्याचं आमिष दाखवल्याच्या आरोपामुळे अडचणीत आलेले कर्नाटकचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी (Ramesh Jarkiholi) यांनी राजीनामा दिला. या प्रकरणात जारकीहोळी यांची एक कथित सेक्स सीडी (Sex CD) बाहेर आल्यानंतर कर्नाटकातील भाजपा सरकार अडचणीत सापडले होते. ज्या सेक्स टेपमुळे त्यांना राजीनामा देण्याची वेळ आली, त्याच प्रकरणात महिलेशी जारकीहोळी यांनी केलेलं संभाषण आता लीक झालं (Conversation Leak) आहे.
कर्नाटकचे सध्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना खूप भ्रष्टाचार केला आहे आणि केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी कर्नाटकचे मुख्यमंत्री होतील असं जारकीहोळींनी या महिलेला सांगितल्याचं कळतंय. तसंच महाराष्ट्रातील लोक चांगले आहेत आणि कानडींना काही काम नाही असंही जारकीहोळी यात म्हणताना दिसत आहे. .
जारकीहोळींनी या सीडीतील सेक्स टेपमध्ये मांडलेल्या मतांमुळे भाजपवर मात्र नामुष्की आली आहे. काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या हे चांगले नेते होते असंही पूर्वाश्रमीचे काँग्रेसी जारकीहोळींनी म्हटलं होतं.
(हे वाचा-केवळ अठरा वर्ष नाही, पदवीधर होईपर्यंत करावा लागणार मुलाचा सांभाळ - न्यायालय)
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते दिनेश कालाहळ्ळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून कर्नाटक पोलिसांनी जारकीहोळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या महिलेला सरकारी नोकरी देण्याच्या बदल्यात जारकीहोळी यांनी तिला सेक्शूअल फेव्हर्ससाठी भाग पाडल्याचं दिनेश यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
माजी मंत्री रमेश जारकीहोळी आणि त्या महिलेचं सेक्स टेपमधून समोर आलेलं संभाषण
महिला : बेळगावात मराठी-कन्नड संघर्ष सारखा सुरू असतो ना?
जारकीहोळी : मराठी माणसं चांगली आहेत. XXX कानडींना काही काम नाही.
जारकीहोळी : सिद्धरामय्या उत्तम आहेत. येडियुरप्पांनी प्रचंड भ्रष्टाचार केला आहे.
महिला : तुम्ही सारखे दिल्लीला जात असता, तुम्ही मुख्यमंत्री होणार का?
जारकीहोळी : प्रल्हाद जोशी मुख्यमंत्री होतील.
(हे वाचा-Reliance समुहाचा मोठा निर्णय, कर्मचाऱ्यांच्या कोरोना लशीचा खर्च कंपनी उचलणार)
या प्रकरणानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्री येडियुरप्पांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, ‘ हे केवळ सेक्स स्कँडल नाही. त्या टेपमध्ये मंत्र्यांनीच मुख्यमंत्री येडियुरप्पा भ्रष्टाचारी असल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांना याचं उत्तर द्यावं लागेल. चेंडू आता त्यांच्या कोर्ट मध्ये आहे. मला असं वाटतं की भाजप सुज्ञ आहे त्यांचे नेते योग्य ती कारवाई करतील.’ जारकीहोळी यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी पोलीस करत आहेत असं कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Karnataka, Yediyurppa