मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Reliance समुहाचा मोठा निर्णय, 6 लाख कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबाच्या कोरोना व्हॅक्सिनचा सर्व खर्च कंपनी उचलणार

Reliance समुहाचा मोठा निर्णय, 6 लाख कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबाच्या कोरोना व्हॅक्सिनचा सर्व खर्च कंपनी उचलणार

Reliance समुहाने कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे पाठवलेल्या पत्रामध्ये ही घोषणा केली आहे. कंपनीकडून कोरोना व्हॅक्सिनचा सर्व खर्च उचलण्यात येणार असून यामध्ये कर्मचाऱ्यांच्या काही ठराविक कुटुंबीयांचा देखील समावेश आहे.

    मुंबई, 05 मार्च: रिलायन्स समुहामध्ये (Reliance Group) काम करणाऱ्या देशभरातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी (Reliance Employees) आनंदाची बातमी आहे. समुहाकडून कर्मचाऱ्यांच्या कोरोना व्हॅक्सिनेशनचा (Coronavirus Vaccination) सर्व खर्च उचलला जाणार आहे.  रिलायन्स फाउंडेशनच्या (Reliance Foundation) चेअरपर्सन आणि संस्थापक नीता अंबानी (Nita Ambani) यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये ही माहिती दिली आहे. नीता अंबानी यांनी सर्व कर्मचाऱ्यांना या ईमेलद्वारे लसीकरण मोहिमेसाठी नोंदणी करण्याची विनंती केली आहे. त्यांनी अशीही माहिती दिली की कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त त्यांची पत्नी किंवा पती, आई-वडील आणि लस घेण्यास पात्र असणारी मुलं यांच्या देखील लसीकरणाचा खर्च कंपनी करणार आहे. रिलायन्स समुहामध्ये साधारण 6 लाख कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांचे कुटुंबीय मिळून ही आकडेवारी 1.9 मिलियनच्या घरात जाते. या सर्वांचा कोरोना लशीचा खर्च रिलायन्स समुहाकडून करण्यात येणार आहे. नीता अंबानी यांनी या मेलमध्ये असेही म्हटले आहे, 'याआधी रिलायन्स फॅमिली डे 2020 च्या मेसेजमध्ये, मुकेश आणि मी दोघांनीही खात्री दिली होती की COVID-19 लशीला मंजुरी मिळाल्यानंतर लगेच रिलायन्स कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना लस मिळावी याकरता आम्ही खास योजना आखू. आम्ही त्या ध्येयाशी बांधिल आहोत.' (हे वाचा-Petrol diesel Price : पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार? सरकार घेऊ शकतं हा मोठा निर्णय) कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पुढे म्हणाल्या की, आपल्या कुटुंबाचे आरोग्य आणि आनंदाची कदर करणे म्हणजेच एखाद्या कुटुंबाचा-रिलायन्स कुटुंबाचा भाग असणे आहे. नीता अंबानी पुढे म्हणाल्या की, 'तुमच्या पाठिंब्यामुळे, आपण लवकरच या पँडेमिकला मागे सोडू. तोपर्यंत निराश होऊ नका. अधिकाधिक सुरक्षा आणि स्वच्छतेची खबरदारी घेणे सुरू ठेवा. आपण या सामुहिक लढाईच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. एकत्र मिळून आपण विजय मिळवला पाहिजे आणि आपण जिंकू. (हे वाचा-नोकरी करता करता सोप्या पद्धतीनं पैसे कमवा; 'हे' गुंतवणुकीचे पर्यात ठरतील फायदेशी) या मेलच्या शेवटी नीता अंबानी यांनी कर्मचाऱ्यांना विश्वास देण्यासाठी 'कोरोना हारेगा, इंडिया जितेगा' (Corona Harega, India Jitega) या घोषवाक्याचा देखील वापर केला आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Coronavirus, Nita ambani, Reliance, Reliance group

    पुढील बातम्या