चंदीगड, 27 डिसेंबर: चंदीगड महापालिका निवडणुकीची आज मतमोजणी सुरू आहे. शुक्रवारी चंदीगडमध्ये मतदान झालं होतं, ज्यात 60 टक्के नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. चंदीगड महापालिका निवडणुकीत एकूण 203 उमेदवार मैदानात उतरले आहेत. चंदीगडमध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि काँग्रेस यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळते. पण यावेळी चंदीगड महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षही रिंगणात उतरला आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे चंदीगडमध्ये पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या आम आदमी पार्टीने सत्ताधारी भाजपला जोरदार धक्के दिले आहेत. चंदीगडमध्ये आम आदमी पक्षाच्या उमेदवाराने भारतीय जनता पक्षाचे महापौर रविकांत शर्मा यांचा दारूण पराभव झाला आहे. प्रभाग क्रमांक 17 मध्ये आम आदमी पक्षाच्या दमनप्रीत यांनी महापौर रविकांत यांचा 828 मतांनी पराभव केला. यासोबतच भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय राणा यांचा आम आदमी पक्षाच्या योगेश ढिंगरा यांच्याकडून पराभव झाला आहे.
हेही वाचा-कालिचरण महाराज अडचणीत, महात्मा गांधींबद्दल केलेलं ते वादग्रस्त वक्तव्य भोवणार
या व्यतिरिक्त प्रभाग क्रमांक 18 मधून AAPच्या उमेदवार तरुणा मेहता यांनी भाजपच्या विद्यमान नगरसेवक सुनीता धवन यांचा पराभव करत विजय मिळवला आहे. प्रभाग 22 मधून AAPच्या अंजू कात्याल यांनी भाजपच्या विद्यमान नगरसेवक हीरा नेगी यांचा पराभव केला. आम आदमी पार्टीने आतापर्यंत 14 जागांवर विजय संपादन केला आहे. तर भाजपला 10 जागा कायम राखता आल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेस पार्टीचा सुफडा साफ झाला असून केवळ 5 जागांवर त्यांना समाधान मानावं लागलं आहे. शिरोमणी अकाली दलाला याठिकाणी केवळ एक जागा मिळाली आहे.
हेही वाचा-सीमेवर पोलीस दलासोबत मोठी चकमक, 6 नक्षलवाद्यांना कंठस्नान, शोधमोहीम सुरू
याबाबत प्रतिक्रिया देताना दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सांगितलं की, 'आम आदमी पार्टी पहिल्यांदाच चंदीगडमध्ये निवडणूक लढवत आहे. सध्याचा ट्रेंड लक्षात घेतला तर चंदीगडच्या लोकांनी आमचं भव्य स्वागत केलं आहे. त्याबद्दल मी प्रत्येक मतदार आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो. चंदीगडमध्ये भाजपसोबत काँग्रेसला देखील मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागत आहे. काँग्रेसचला चंदीगड महापालिकेत तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळात आहेत. भाजप आणि काँग्रेस पक्षाच्या चुरसीत आपने जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chandigarh, Election