मराठी बातम्या /बातम्या /देश /सीमेवर पोलीस दलासोबत मोठी चकमक, 6 नक्षलवाद्यांना कंठस्नान, शोधमोहीम सुरू

सीमेवर पोलीस दलासोबत मोठी चकमक, 6 नक्षलवाद्यांना कंठस्नान, शोधमोहीम सुरू

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Crime News: सुकमा जिल्ह्यातील तेलंगणा-छत्तीसगड सीमेवर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक (Encounter) घडल्याची माहिती समोर आली आहे.

सुकमा, 27 डिसेंबर: सुकमा जिल्ह्यातील तेलंगणा-छत्तीसगड सीमेवर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक (Encounter) घडल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीत पोलीस दलाने अनेक नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत एकूण सहा नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. शिवाय घटनास्थळावरून अनेक हत्यारे देखील जप्त करण्यात आले आहे. ठार केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये काही महिला देखील आहेत.

तेलंगणाच्या कोत्तागुडम येथील एसपी सुनील दत्त यांच्या नेतृत्वात ही मोहीम पार पाडण्यात आली आहे. घटनास्थळी अद्याप शोधमोहीम सुरू आहे. यावेळी एसपी सुनील दत्त यांनी सांगितलं की, तेलंगणा आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती भागातील किस्ताराम पीएसच्या जंगल परिसरात ही चकमक घडली आहे. या चकमकीत आतापर्यंत सहा नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलं (6 Naxals killed by police) असून त्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत.

हेही वाचा-पौगंडावस्थेत आल्यानंतर मुस्लीम मुलगी स्वत:च्या मर्जीने करू शकते विवाह- हाय कोर्ट

तेलंगणा-छत्तीसगड पोलीस आणि CRPF यांची संयुक्त कारवाई

एसपी सुनील दत्त यांनी पुढे सांगितलं की, हे ऑपरेशन तेलंगणा पोलीस, छत्तीसगड पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्तपणे राबवलं आहे. आठवडाभरापूर्वी छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांनी 2 महिला नक्षलवाद्यांना ठार केलं होतं. या महिला नक्षलवाद्यांवर 6 लाख रुपयांचं बक्षीस होतं. गुप्त माहितीच्या आधारे अरणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोंडेरास गावच्या जंगलात सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली.

हेही वाचा-घनदाट काळोखात लोकवस्तीत शिरला बिबट्या; तिघांना केलं रक्तबंबाळ,धडकी भरवणारा VIDEO

दंतेवाडा जिल्ह्याचे एसपी अभिषेक पल्लव यांनी देखील या चकमकीला दुजोरा दिला आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत मलांगेर क्षेत्र समितीचे सदस्य हिडमे कोहरामे आणि चेतना नाट्य मंडळाचे प्रभारी पोज्जा यांना ठार केलं. नक्षलवादी कोहरामे याच्यावर 5 लाख रुपये तर पोज्जा याच्यावर 1 लाख रुपयांचं बक्षीस होतं.

First published:
top videos

    Tags: Chhattisgarh