नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर: आपल्या भारतीय समाजात (Indian Society) सेक्स (Sex),लैंगिक विषय यावर जाहीरपणे बोलण्यास मान्यता नाही. पूर्वापार चालत आलेल्या या समजुतींच्या जोखडातून अलीकडच्या आधुनिक काळात काही प्रमाणात सुटका झाली असली तरी आजही सेक्सबाबत खुलेपणाने चर्चा होण्याचे प्रमाण कमी आहे. लोक सेक्सविषयक गुप्तपणे वाचतात, परंतु ते या विषयावर बोलत नाहीत. त्यातही स्त्रियांनी (Woman) या विषयाबाबत मोकळेपणाने बोलणे म्हणजे जणू पापच समजलं जातं. त्यामुळे आजही अनेक स्त्रिया सेक्सबाबत कोणतीही समस्या असली तरी मोकळेपणाने बोलत नाहीत. सेक्स ही नैसर्गिक गरज आहे. पुरुषांप्रमाणेच ती स्त्रीलाही असतेच. पुरुषांना जसे झोपेत सेक्ससंबंधी विचारांमुळे उत्तेजना जाणवते तसंच स्त्रीलाही झोपेत ऑरगॅझम (Orgasm) म्हणजे झोपेतही सेक्सची उत्तेजना जाणवते; पण असं होणं म्हणजे चुकीचं मानलं जातं. समाजाच्या अशा मानसिकतेमुळे स्त्रियांमध्ये अपराधीपणाची भावना निर्माण होते. हे अत्यंत नैसर्गिक असून, यामागे शास्त्रीय कारणं आहेत. मात्र त्याची माहिती नसल्याने स्त्रिया स्वतः ला दोषी ठरवतात. नवभारत टाईम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
हेही वाचा- दिवाळीत Beautiful दिसायचं आहे? एथनिक लूक हवाय?, मग नक्की या अॅक्सेसरीजचा करा वापर
हेही वाचा- 2 बायकांची हौस पुरवता पुरवता नवऱ्याचे झाले हाल; अखेर उचचलं धक्कादायक पाऊल
सेक्सबद्दल सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी झोपेतील ऑरगॅझमची मदत होते. उत्तेजना वाढवण्यासाठी स्त्रिया झोपण्यापूर्वी आपल्या स्तनाग्रांना (Nipples) स्पर्श करून स्वत:ला उत्तेजित करू शकतात आणि झोप लागल्यानंतर ऑरगॅझमचा अनुभव घेऊ शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sexual health, Sexual wellness