मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

2 बायकांची हौस पुरवता पुरवता नवऱ्याचे झाले हाल; अखेर उचचलं धक्कादायक पाऊल

2 बायकांची हौस पुरवता पुरवता नवऱ्याचे झाले हाल; अखेर उचचलं धक्कादायक पाऊल

फोटो सौजन्य - Canva

फोटो सौजन्य - Canva

दोन लग्न केल्यानंतर तो पुरता फसला.

  • Published by:  Priya Lad

भोपाळ, 29 ऑक्टोबर : लग्न (Marriage) म्हणजे फक्त दोन जीवांचं मीलन नाही तर एक जबाबदारी असते. जोडीदाराला (Husband wife) प्रेम देण्यासह त्याचा सांभाळ करणं, त्याच्या सुखदुःखात त्याला साथ देणं, त्याच्या आवडीनिवडी जपणं, त्याला काय हवं नको ते बघणं, त्याची मागणी पूर्ण करणं हे सर्वही आलंच. अशात दोन लग्न (Two marriage) करणं म्हणजे तारेवरची कसरतच. तसं पहिलं लग्न मोडल्याशिवाय दुसऱ्या लग्नाला मान्यता नसते (Man married with 2 woman). म्हणजे दोन लग्न करता येत नाहीत. तरी काही जण अशी लग्न करताना दिसतात आणि मग ते त्यांच्याच गळ्याशी येते. सध्या असंच एक प्रकरण समोर आलं आहे (Man 2 wives), दोन लग्न करणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. दोन बायका करून ही व्यक्ती फसली आहे (Husband become thief for 2 wives).

मध्य प्रदेशच्या (Madhya pradesh) इंदोरमधील (Indore) 55 वर्षीय कुतुबुद्दीन. ज्याने दोन लग्न केली आहेत. दोन पत्नींचा खर्च उचलणं त्याला शक्य होत नव्हतं.  त्यांची हौस पूर्ण करता करता त्याचे हाल झाले होते. अखेर दोन्ही बायकांची मागणी पूर्ण करण्यासाठी त्याने धक्कादायक पाऊल उचललं. आपल्या पत्नींसाठी तो चोर बनला. अखेर पोलिसांच्या तावडीतही तो सापडला.

हे वाचा - आता महिला-पुरुषांसाठी एकच कंडोम; इथं मिळेल जगातलं पहिलं Unisex condom

इंदोरमध्ये हीरानगर पोलीस गाड्यांची तपासणी करत होते. बापट चौकात विना नंबरची गाडी दिसली, त्यांनी ही गाडी थांबवली. गाडीचालकाकडे गाडीशी संबंधित कोणतीच कागदपत्रं नव्हतं. पण त्याच्याकडे एक चाकू सापडला. पोलीस त्याला हीरानगर पोलीस ठाण्यात घेऊन गेले.

त्याची चौकशी केली असता ती गाडी चोरीची असल्याचं समजलं. जानेवारी आयटीआय मैदानातून त्याने ही गाडी चोरी केली होती. मैदानात तो फिरण्यासाठी गेला होता. हीरानगर पोलीस ठाण्यात या गाडीचोरीची तक्रारही होती. गाडीची नंबर प्लेट तोडून त्याने फेकून दिली होती आणि बिना नंबरच्या गाडीत तो फिरत होता.

हे वाचा - 'हे मॅजिक ऑईल लावताच तुमच्याकडे येईल पैसा', महिलेचा दावा; VIDEO सुद्धा शेअर केला

पंजाब केसरीच्या वृत्तानुसार कुतुबुद्दीन ही नंदानगरचा राहणारा आहे. आधी तो हीरानगर परिसरात राहायचा. दोन लग्न केल्यानंतर बायकोंचा खर्च उचलण्यासाठी त्याने काही वर्षांपूर्वी चोरी करायला सुरुवात केली. संधी साधून तो गाडी चोरायचा आणि त्या विकायचा. त्याच्याविरोधात हीरानगर, कनाडिया, सेंटर कोतवाली, बदगौंदा, जुनं इंदौर, अन्नपूर्णा, खजराना  या ठिकाणी चोरीच्या आठ तक्रारी आहेत.

First published:

Tags: Lifestyle, Madhya pradesh, Relationship, Wife and husband