उत्तराखंड, 7 फेब्रुवारी : चामोली येथे हिमकडा कोसळून महापूर आल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. SDRF चे 60 हून अधिक जवान वेगवेगळ्या ठिकाणी तुकड्यांनुसार घडनास्थळी रवाना झाले आहेत. तसंच एनडीआरएफ आणि तीन टीम गाझियाबादहून एयरलिफ्ट करण्यात येत असल्याची माहिती NDRF कडून देण्यात आली आहे. SDRF सतर्क असून अफवा न पसरवण्याचं आवाहन करण्यात येत आहे. अफवा न पसरवता केवळ सरकारी अधिकृत माहितीकडेच लक्ष देण्याचं सांगण्यात आलं आहे. 200 हून अधिक जवान घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने मदतकार्य सुरू आहे.
Over 200 jawans are on the job & working in collaboration with local administration. One team is on the spot to assess the situation. Another team is deployed near Joshimath to raise awareness & evacuate people. The situation is under control: Vivek Pandey, ITBP Spokesperson pic.twitter.com/1Y65hTzdvP
— ANI (@ANI) February 7, 2021
दरम्यान, नंदप्रयागहून पुढे अलकनंदा नदीचा प्रवाह सामान्य होत असल्याची माहिती मिळत आहे. पाण्याचा प्रवाहही कमी होत असल्याची माहिती आहे.
(वाचा - Uttarakhand News : उत्तराखंडमध्ये महाप्रलय, 10 हजार लोकांना फटका बसण्याची शक्यता ) एका वृत्तवाहिनीशी बोलताना राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रिद्धिमा अग्रवाल यांनी सांगितलं की, दोन्ही वीज प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 100 ते 150 लोकांबाबत माहिती नसल्याचं समोर आलं आहे. अचानक आलेल्या महापूरानंतर या लोकांबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

)







