उत्तराखंड, 07 फेब्रुवारी : देवभूमी असलेल्या उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा निसर्गाचा प्रकोप झाला आहे. धौलीगंगा नदीत मोठा हिमकडा कोसळला आहे. त्यामुळे नदीला महापूर आला आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला आहे. या दुर्घटनेत 10 हजार लोकांना या महापुराचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जोशीमठ तालुक्यातील रैणी गावात आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. हिमकडा कोसळून धौली गंगा नदीत कोसळला आहे. त्यामुळे नदीला महापूर आला आहे. हिमकडा कोसळल्यामुळे धरणाच्या भिंतीचा काही भाग कोसळल्याचे वृत्त आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नदीला महापूर आला असून गावांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. खबरदारी म्हणून भागीरथी नदीचे पाणी अडवण्यात आले आहे. अलकनंदाचे पाणी थांबवण्यात यावे यासाठी श्रीनगर धरण आणि ऋषिकेश धरण खाली करण्यात येत आहे.
#WATCH | Water level in Dhauliganga river rises suddenly following avalanche near a power project at Raini village in Tapovan area of Chamoli district. #Uttarakhand pic.twitter.com/syiokujhns
— ANI (@ANI) February 7, 2021
उत्तरांखडमध्ये SDRF टीम नदी शेजारी राहणाऱ्या लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. काही गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. अजूनही काही ठिकाणी लोकं अडकलेली आहे. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. धौलीगंगा नदीला महापूर आला असून नंदप्रयाग, कर्णप्रयाग, देवप्रयाग, रुद्रप्रयाग या परिसरातील हॉटेल, लॉज आणि घरं खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसंच किर्ती नगर, देवप्रयाग, मुनी भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाण्याचा वेग जास्त प्रमाणात असल्यामुळे काही लोकं आणि घरं वाहून गेली आहे,अशी माहिती उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
खबरदारी म्हणून भागीरथी नदीचे पाणी अडवण्यात आले आहे. अलकनंदाचे पाणी थांबवण्यात यावे यासाठी श्रीनगर धरण आणि ऋषिकेश धरण खाली करण्यात येत आहे. SDRF ची टीम अलर्टवर आहे. लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून नये, शासनाकडून वेळोवेळी सुचना देण्यात येईल, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.