मराठी बातम्या /बातम्या /देश /

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण मार्च 2024 पर्यंत सुरू ठेवणार

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण मार्च 2024 पर्यंत सुरू ठेवणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण (PMAY-G) मार्च 2021 नंतरही सुरू ठेवण्याच्या ग्रामीण विकास विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

    नवी दिल्ली, 8 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी  (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण (PMAY-G) मार्च 2021 नंतरही सुरू ठेवण्याच्या ग्रामीण विकास विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. ज्यामध्ये एकूण 2.95 कोटी घरांच्या उद्दिष्टापैकी 31 मार्च 2021 पर्यंतच्या उर्वरित 155.75 लाख घरांच्या बांधकामासाठी आर्थिक सहाय्य पुरवले जाणार आहे. 2.95 कोटी घरांच्या एकत्रित उद्दिष्टातील उर्वरित घरांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी विद्यमान नियमांनुसार मार्च 2021 च्या पुढे मार्च 2024 पर्यंत प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण चालू ठेवली जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण (Pradhan Mantri Awas Yojana Gramin) अंतर्गत 2.95 कोटी घरांचे एकत्रित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उर्वरित 155.75 लाख घरांच्या बांधकामासाठी एकूण 2,17,257 कोटी रुपये खर्च येणार आहे. यामध्येकेंद्राचा वाटा 1,25,106 कोटी रुपये आणि राज्याचा वाटा 73,475 कोटी रुपये असणार आहे. तर नाबार्डला व्याज परतफेड करण्यासाठी 18,676 कोटी रुपयांची अतिरिक्त आवश्यकता आहे. CDS बिपीन रावत यांना घेऊन जाणारं लष्कराचं हेलिकॉप्टर क्रॅश! अपघाताचे भीषण PHOTOS आले समोर काय फायदा होणार? मार्च 2024 पर्यंत योजना सुरू ठेवल्यामुळे ग्रामीण भागात "सर्वांसाठी घरे" हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत 2.95 कोटी घरांच्या एकूण उद्दिष्टापैकी मूलभूत सुविधांसह उर्वरित 155.75 लाख पक्की घरे बांधण्यासाठी मदत दिली जाईल. अपघातग्रस्त झालेलं Mi-17V-5 हेलिकॉप्टर वायुदलातील सर्वश्रेष्ठ! 29 नोव्हेंबर 2021 पर्यंत, एकूण 2.95 कोटी उद्दिष्टांपैकी 1.65 कोटी घरे बांधण्यात आली आहेत. 2.02 कोटी घरे, जी एसईसीसी 2011 डेटाबेस आधारित स्थायी प्रतीक्षा यादीच्या जवळपास समान आहेत त्यांचे बांधकाम 15 ऑगस्ट 2022 च्या मुदतीपर्यंत पूर्ण होईल. त्यामुळे, 2.95 कोटी घरांचे एकूण उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, मार्च 2024 पर्यंत योजना सुरू ठेवण्याची गरज आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Pm modi, Pradhan mantri awas yojana

    पुढील बातम्या