Home /News /explainer /

Bipin Rawat Chopper Crash: अपघातग्रस्त झालेलं Mi-17V-5 हेलिकॉप्टर वायुदलातील सर्वश्रेष्ठ! PM मोदीही करतात प्रवास, वैशिष्ट्ये जाणून घ्या

Bipin Rawat Chopper Crash: अपघातग्रस्त झालेलं Mi-17V-5 हेलिकॉप्टर वायुदलातील सर्वश्रेष्ठ! PM मोदीही करतात प्रवास, वैशिष्ट्ये जाणून घ्या

तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळलं. यात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांच्यासह स्टाप आणि कुटुंबातील काही सदस्य होते. प्राथमिक माहितीनुसार, हे एमआय सीरीज आर्मी हेलिकॉप्टर कोईम्बतूरमधील सुलूर एअर फोर्स बेसवरून कुन्नूरमधील वेलिंग्टनला जात होते. खराब हवामानामुळे हा अपघात अचानक घडला. एमआय सीरीजचे हे हेलिकॉप्टर अत्यंत सुरक्षित मानले जात आहे. त्याची वैशिष्ट्ये जाणून घ्या.

पुढे वाचा ...
    तमिळनाडू, 8 डिसेंबर: तमिळनाडू येथील कुन्नूरमध्ये मोठा अपघात झाला आहे. कुन्नूर येथे लष्कराचं हेलिकॉप्टर (IAF Mi-17V5 Helicopter crashes) कोसळलं आहे. या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपीन रावत, त्यांचा स्टाफ आणि कुटुंबातील काही सदस्य असल्याची माहिती भारतीय वायू दलाने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. यात जीवितहानी झाली की नाही याबद्दल अद्याप माहिती आलेली नाही. दरम्यान, हा अपघात कसा झाला? याचा तपास सुरू असल्याची माहिती वायू दलाने दिली आहे. अपघातग्रस्त झालेलं हेलिकॉप्टर (Mi-17V5 Helicopter) वायूदलातील सर्वश्रेष्ठ वाहनांपैकी एक होतं. 26/11 कमांडो ऑपरेशनमध्येही याचा वापर झाला होता. अपघातग्रस्त विमान MI17 V5 हे भारतीय हवाई दलाचे अत्यंत शक्तिशाली हेलिकॉप्टर आहे. हेलिकॉप्टर MI17 V5 आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. हे हेलिकॉप्टर हवाई दलाच्या अनेक महत्त्वाच्या ऑपरेशन्सचाही एक भाग आहे. भारतीय हवाई दलाचे Mi-17V-5 हेलिकॉप्टर हे खासकरुन लष्करी वाहतुकीसाठी वापरले जाते. रशिया या वाहनांची निर्मिती करतो. हे हेलिकॉप्टरच्या Mi-8/17 कुटुंबाचा भाग आहेत. हे वाहन जगातील सर्वात आधुनिक हेलिकॉप्टरपैकी एक आहे. हे सैन्य आणि शस्त्रास्त्र वाहतूक करण्यासाठी देखील तैनात केले जाऊ शकते. याचा वापर शोध मोहिमेमध्ये, गस्त घालणे, मदत आणि बचाव कार्यात केला जातो. हे आहे वैशिष्ट्ये या हेलिकॉप्टरचा कमाल वेग 250 किमी/तास आहे. ते कमाल 6000 मीटर उंचीपर्यंत उड्डाण करण्यास सक्षम आहे. एकदा इंधन भरल्यानंतर ते 580 किमी जाऊ शकते. दोन सहायक इंधन टाक्या भरल्यानंतर ते 1065 किमी अंतर कापू शकते. हेलिकॉप्टर जास्तीत जास्त 13,000 किलो वजनासह उड्डाण करू शकते. याच्या मदतीने सुमारे 36 सशस्त्र सैनिक नेले जाऊ शकतात. तामिळनाडूतील अपघातग्रस्त लष्कराच्या Mi-17V-5 हेलिकॉप्टरमध्ये कोण कोण होते? यादी आली समोर प्राणघातक शस्त्रांनी सज्ज हेलिकॉप्टर अनेक प्रकारच्या शस्त्रांनी सुसज्ज आहे. यात 5 क्षेपणास्त्र, एस-8 रॉकेट, एक 23 मिमी मशीनगन आणि पीकेटी मशीनगनसह 8 फायरिंग पोस्ट आहेत. या पोस्टचा उपयोग शस्त्रे लक्ष्यापर्यंत भेदण्यासाठी केला जातो. यातील तंत्रज्ञानामुळे रात्रीही सहज कारवाई करता येते. हे विमान भारतीय हवाई दलाच्या अनेक बचाव आणि मदत कार्यातही खूप महत्त्वाची भूमिका बजावते. 26/11 कमांडो ऑपरेशनमध्ये वापर 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी एनएसजी कमांडो या हेलिकॉप्टरमधून कुलाब्यात उतरले होते. अहवालानुसार, जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लॉन्च पॅड नष्ट करण्यासाठी सप्टेंबर 2016 मध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्येही त्यांचा वापर करण्यात आला होता. भारताकडे सध्या 150 हून अधिक Mi-17 V5 हेलिकॉप्टर आहेत. यातील शेवटचे विमान रशियाने जानेवारी 2016 मध्ये भारताला सुपूर्द केले होते. IAF Helicopter crash in Tamil Nadu: CDS बिपीन रावत यांना घेऊन जाणारं लष्कराचं हेलिकॉप्टर क्रॅश! अपघाताचे भीषण PHOTOS आले समोर यापूर्वीही झाला होता अपघात अरुणाचल प्रदेशात चीन सीमेपासून 12 किमी अंतरावर भारतीय हवाई दलाचे विमान MI17 V5 तांत्रिक बिघाडामुळे कोसळलं. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाल्याची माहिती आहे. अरुणाचल प्रदेशातील तवांगजवळील खिरमू भागात हा अपघात झाला. हेलिकॉप्टर लष्करासाठी हवाई देखभालीचे सामान घेऊन जात होते.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Army, Indian army, Pm modi

    पुढील बातम्या