मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबईनंतर नवी मुंबईतही 350 कामगारांचे बोगस लसीकरण, दुसरा डोस देताना घोटाळा उघड

मुंबईनंतर नवी मुंबईतही 350 कामगारांचे बोगस लसीकरण, दुसरा डोस देताना घोटाळा उघड

Fake Vaccination Scam: मुंबईनंतर पुन्हा एकदा बोगस लसीकरणाचा घोटाळा उघड झाला आहे. या बोगस लसीकरणासाठी कंपनीकडून 4 लाख 24 हजार रुपये उकळले.

नवी मुंबई, 03 जुलै: मुंबईनंतर आता नवी मुंबईत (Navi Mumbai) ही बोगस लसीकरण (Fake Vaccination Scam) झाल्याचं उघड झालं आहे. नवी मुंबईत तब्बल 350 कामगारांचे बोगस लसीकरण झालं आहे. शिरवणे एमआयडीसी मधील अटोम्बर्ग टेक्नॉलॉजी कंपनीत ही बोगस लसीकरण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या बोगस लसीकरणासाठी कंपनीकडून 4 लाख 24 हजार रुपये उकळले. धक्कादायक म्हणजे लसीकरण झाल्यानंतर बनावट प्रमाणपत्रही देण्यात आले. कंपनीनं केईसीपी हेल्थ केअर हॉस्पिटल सोबत करार केला होता. कामगारांना दुसरा डोस देताना बनावट लसीचा प्रकार उघडकीस आला. या बोगस लसीकरण प्रकरणात डॉ महेश त्रिपाठी, करीम आणि एक अज्ञातव्यक्ती विरोधात तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईतही बोगस लसीकरण

मुंबईतील उच्चभू परिसरात बोगस लसीकरण (Mumbai Fake Vaccination Scam) झाल्याची माहिती उघडकीस आली आणि एकच खळबळ उडाली. मुंबईकरांच्या जीवाशी खेळणाऱ्यांच्या मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कारवाई करत मुसक्या आवळल्या आहेत. मुंबई पोलिसांसोबत मुंबई महानगरपालिकेनेही (BMC) या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत एका रुग्णालयावर (BMC action against hospital) कारवाई केली आहे. (BMC cancels Shivam Hospital license)

हेही वाचा- मोठी बातमी: Video रेकॉर्ड करत पुण्यात सुप्रसिद्ध कला दिग्दर्शकाची आत्महत्या

मुंबईतील कांदिवली परिसरात असलेल्या चारकोप (Charkop Kandivali) भागातील शिवम रुग्णालया (Shivam Hospital) वर मुंबई महानगरपालिकेने शुक्रवारी कारवाई केली आहे. पालिकेने शिवम नर्सिंग होमचा परवाना रद्द करून संपूर्ण परिसर सील केला आहे. मुंबई नर्सिंग होम्स नोंदणी कायदा 1949 अंतर्गत महानगरपालिकेने रुग्णालयाचा नोंदणी परवाना सुद्धा रद्द केला आहे.

First published:

Tags: Corona vaccination, Coronavirus, Mumbai