मराठी बातम्या /बातम्या /देश /

'मला पकडून दाखवा,' MBA पदवीधारकानं 4 वर्षात चोरली 14 वाहनं, वर पोलिसांनाच व्हॉटस अ‌ॅप मेसेज करत दिलं आव्हान, मग...

'मला पकडून दाखवा,' MBA पदवीधारकानं 4 वर्षात चोरली 14 वाहनं, वर पोलिसांनाच व्हॉटस अ‌ॅप मेसेज करत दिलं आव्हान, मग...

पोलिसांना व्हॉटस अ‌ॅप मेसेज करून आपल्याला पकडून दाखवण्याचं आव्हान देणाऱ्या चोराला पोलिसांनी अटक केली आहे. या ४१ वर्षीय चोराकडून टोयोटा फॉर्च्युनर आणि एक ऑडी जप्त करण्यात आली आहे. त्याला एक मुलगा असून तो वाणिज्य शाखेचं शिक्षण घेत आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Digital Desk

बंगळुरू, 17 मार्च : फायनान्समध्ये एमबीएची पदवी (MBA in finance) घेतलेल्या या व्यक्तीला पोलिसांनी वाहन चोरीच्या प्रकरणात (Car theft in Bengaluru) नुकतीच अटक केली आहे. या व्यक्तीनं 4 वर्षांत तब्बल 14 वाहनं चोरली आहेत. याहूनही विशेष म्हणजे या चोरानं चक्क पोलिसांनाच आपल्याला पकडून दाखवावं, असं आव्हान दिलं होतं.

पोलिसांना व्हॉटस अ‌ॅप मेसेज (whats app message) करून आपल्याला पकडून दाखवण्याचं आव्हान देणाऱ्या चोराला पोलिसांनी (police) अटक केली आहे. या ४१ वर्षीय चोराकडून टोयोटा फॉर्च्युनर आणि एक ऑडी जप्त करण्यात आली आहे. त्याला एक मुलगा असून तो वाणिज्य शाखेचं शिक्षण घेत आहे. सत्येंद्र सिंह शेखावत असं या चोराचं नाव आहे. तो मूळचा राजस्थानातील जयपूरचा रहिवासी असून गेल्या चार वर्षांपासून बंगळुरू इथं चारचाकी गाड्यांची चोरी करत असे. शेखावत यानं गेल्या चार वर्षांत 14 वाहनं चोरल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

'तुम्हाला मला पकडता येत असेल तर पकडून दाखवा,' असं आव्हान शेखावत यानं पोलिसांना दिलं होतं. शेखावतनं तेलंगणा पोलिसांना व्हॉट्सअॅप मेसेज पाठवला होता की, 'तुम्ही मला पकडू शकत असाल तर मला पकडून दाखवा.' पोलिसांनी हे आव्हान स्वीकारलं आणि चोराला अटक केली.

हे वाचा - आता 200 किमी प्रतितास वेगाने धावणार Vande Bharat ट्रेन!

या राज्यांमध्ये आतापर्यंत वाहनं चोरीला जात होती

आलिशान कार आणि एसयूव्हीच्या डुप्लिकेट चाव्या बनवण्यासाठी गॅजेट्स वापरण्यासाठी शेखावत कुप्रसिद्ध आहे. 2003 मध्ये पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये त्याचं नाव पहिल्यांदा नोंदवलं गेले. शेखावत याच्यावर आतापर्यंत कर्नाटक, दिल्ली, महाराष्ट्र, हैदराबादसह गुजरात, तामिळनाडू, दमण-दीव आणि तेलंगणामध्ये 40 हून अधिक वाहनांच्या चोरीचा आरोप आहे.

रिपोर्टनुसार, शेखावत अनेकवेळा तुरुंगातही गेला आहे. त्याच्यावर विविध राज्यांमध्ये गुन्ह्यांच्या नोंदी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीच्या आरोपावरून तुरुंगातून सुटल्यानंतर तो पुन्हा नव्या चोऱ्या करण्यामध्ये गुंतला.

हे वाचा - भगवंत मान आज करणार मोठी घोषणा; Tweet करत म्हणाले, 'इतिहासात आजवर...'

ऑगस्ट 2021 मध्ये, तेलंगणा पोलिसांनी शेखावतच्या पत्नीला चोरीची वाहनं विकल्याबद्दल अटक केली. त्यानंतर त्याला राजस्थानच्या स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर शेखावतच्या पत्नीला तपासासाठी त्याच्या राज्यात घेऊन जाण्यासाठी बॉडी वॉरंटची मागणी करण्यात आली. ती न्यायालयानं फेटाळून लावली आणि पोलिसांना तिची सुटका करण्यास भाग पडलं.

First published:

Tags: Bengaluru, MBA, Thief