शिमला: काळ कधी कुठे कसा कोणावर येईल याचा नेम नाही. रस्त्याने जाणाऱ्या एका कुटुंबावर एकाळाने घाला घातला आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. एक दु:खद घटना समोर आली आहे. ३०० फूट खोल दरीत कार कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. बाळंत झालेल्या मुलीला पाहण्यासाठी आणि तो आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला. ज्या कारमधून कुटुंब मुलीकडे जात होतं ती कार दरीत कोसळली. या भीषण दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. ही धक्कादायक घटना हिमाचल इथल्या शिमला जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली आहे. या कुटुंबातील एक व्यक्ती गंभीर जखमी आहे. एकाच कुटुंबातील आठ जण दोन कारमधून मुलीकडे जात होते. पुलबहाळ येथून ग्रामपंचायत देईच्या चेलराना गावाकडे जात असताना ही दुर्घटना घडली.
नोकरी मिळाली नाही तर आत्या म्हणाली वेश्या व्यवसायात चांगले पैसे मिळतील, पुण्यात तरुणीची सुटका
बोलेरो जीपमध्ये पाच जण होते, तर मारुती कारमध्ये तीन जण होते. यादरम्यान नेरवा-चौपाळ मुख्य रस्त्यावर नेवतीजवळ बोलेरो जीपचा अपघात होऊन तीनशे मीटर खाली हमलती दरीत कोसळली. मागच्या गाडीत असलेल्या कुटुंबाने हा अपघात कसा झाला ते सांगितलं. जीपच्या चालकाचा दुचाकी वाचवण्याच्या प्रयत्नात तोल गेला आणि जीप कुठेही न धडकता तीनशे मीटर खाली हमलती दरीत कोसळली. एका महिलेचा मृतदेह सुमारे आठशे मीटर दरीत वाहून गेला, ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली ती जागा इतकी दुर्गम आहे की मृतदेह बाहेर काढण्यासाठी अर्धा किलोमीटर अंतरावरून पायी जावं लागतं. पोलीस आणि स्थानिकांना मृतदेह बाहेर काढण्यासाठी साधारण दीड तास लागला.
नोएडातील ट्वीन टॉवर स्फोटाने नाही तर इम्प्लोजन पद्धतीने पाडणार! अचंबित करणारी प्रोसेस
या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा नेरवा रुग्णालयात मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीला आयजीएमसी शिमला इथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.