मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

नोकरी मिळाली नाही तर आत्या म्हणाली वेश्या व्यवसायात चांगले पैसे मिळतील, पुण्यात तरुणीची सुटका

नोकरी मिळाली नाही तर आत्या म्हणाली वेश्या व्यवसायात चांगले पैसे मिळतील, पुण्यात तरुणीची सुटका

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

पुण्यात आल्यावर तिने नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India
  • Published by:  News18 Desk

पुणे, 26 ऑगस्ट : एका 19 वर्षांच्या तरुणीला नोकरीच्या बहाण्याने पुण्यात आणले गेले होते आणि नोकरीच्या बहाण्याने तिला वेश्याव्यवसाय करायला लावल्याचा संतापजनक प्रकार समोर आले आहे. कुंटणखान्यातून या तरुणीची फरासखाना पोलिसांनी सुटका केली आहे. तिची आत्या काही काळ पुण्यात राहिली होती. या तिच्या आत्यानेच तिला बुधवार पेठेत व्यवसाय केल्यावर चांगले पैसे मिळतात, असे सांगितल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

एका मुलीला डायमंड बिल्डिंगमध्ये डांबून ठेवले आहे, अशी माहिती पोलीस नियंत्रण कक्षाकडून मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला आणि एका 19 वर्षांच्या तरुणीची सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी कुंटणखाना मालकीण रिटा बीरबहाद्दूर तमांग (रा. डायमंड बिल्डिंग, बुधवार पेठ) हिला तिच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे.

ज्या तरुणीची सुटका करण्यात आली तिला मोडके तोडके हिंदी येत होते. त्यामुळे नेपाळी सामाजिक कार्यकर्त्या महिलेच्या मदतीने तिच्याशी संवाद साधण्यात आला. ती मूळची नेपाळची राहणारी आहे. तसेच तिच्या आत्यानेच पुण्यात नोकरी मिळेल, असे तिला सांगितले आणि सुमारे एक महिन्यापूर्वी पुण्यात पाठविले होते.

पुण्यात आल्यावर तिने नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिची भाषेची अडचण आणि कमी शिक्षणामुळे तिला कुठेही नोकरी मिळाली नाही. याच कालावधीत तिच्याजवळचे पैसेही संपले. यामुळे तिने आपल्या गावी आत्याला फोन केला आणि घडलेला प्रकार सांगितला तसेच तिला पैशांची गरज आहे, हेदेखील सांगितले. यावर तिच्या आत्याने तिला सांगितले की, बुधवार पेठ भागात राहून वेश्या व्यवसाय केला तर चांगले पैसे भेटतील.

हेही वाचा - पुणे : तीन मुलांच्या बापाचे दुसऱ्या महिलेशी संबंध, प्रेयसीने लग्नाचा तगादा लावला अन्

इतकेच नव्हे तर तिच्या ओळखीच्या रिटा तमांग हिचा पत्ताही दिला. त्यानुसार ही तरुणी तमांगना भेटली. त्यांच्यात पैशाचीही बोलणी झाली. त्यानंतर ती तेथेच थांबली. त्याच दिवशी पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला आणि या तरुणीची सुटका केली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे अधिक तपास करीत आहेत.

First published:

Tags: Pune, Pune crime news