मराठी बातम्या /बातम्या /देश /PHOTO : नोएडातील ट्वीन टॉवर स्फोटाने नाही तर इम्प्लोजन पद्धतीने पाडणार! अचंबित करणारी प्रोसेस

PHOTO : नोएडातील ट्वीन टॉवर स्फोटाने नाही तर इम्प्लोजन पद्धतीने पाडणार! अचंबित करणारी प्रोसेस

नोएडामधील ट्विन टॉवर इम्प्लोजन प्रक्रियेद्वारे पाडले जाणार आहेत. तर ही प्रक्रिया कशी असते, त्यावर एक नजर टाकूया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

दिल्लीजवळच्या नोएडामधील (Noida) ट्वीन टॉवर्स (twin towers) पाडण्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. दिल्लीच्या कुतुबमिनारपेक्षा (Qutub Minar) उंच असलेल्या नोएडाच्या सेक्टर 93A मधील सुमारे 100 मीटर उंच इमारती रविवारी 28 ऑगस्ट रोजी दुपारी 2.30 वाजता जमीनदोस्त केल्या जातील.

हे टॉवर्स रियल्टी फर्म सुपरटेकने (realty firm Supertech) बांधले होते. हे पाडकाम करताना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या टॉवर्सशेजारील एमराल्ड कोर्ट (Emerald Court) आणि एटीएस व्हिलेज (ATS Village) या दोन सोसायट्यांमधील सर्व रहिवाशांना बाहेर काढलं जाणार आहे.

सुपरटेक ट्विन टॉवर पाडण्याचं कंत्राट एडिफिस इंजिनीअरिंगला (Edifice Engineering) मिळालं आहे. हे ट्विन टॉवर इम्प्लोजन (Implosion ) प्रक्रियेद्वारे पाडले जाणार आहेत. तर ही प्रक्रिया कशी असते, त्यावर एक नजर टाकूया.

वस्तू एकमेकांवर आपटून त्या नष्ट करण्याच्या मेकॅनिकल प्रक्रियेला इम्प्लोजन (Implosion) म्हणतात. हा एक्स्प्लोजन (Explosion) याचा विरुद्धार्थी शब्द आहे आणि या प्रक्रियेत दोन वस्तू किंवा इमारतींची धडक घडवून आणण्यासाठी त्या पदार्थांचा व्हॉल्युम आणि एनर्जी मुद्दाम कमी केली जाते.

दोन इमारती एकमेकांवर आदळल्याने झालेल्या स्फोटातून त्या नष्ट होतील. दक्षिण आफ्रिकेतील जेट डिमॉलिशनसह एडिफिस इंजिनीअरिंगने ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी सुपरटेक ट्विन टॉवर अॅपेक्स (Apex) आणि Ceyanne वर सुमारे 10,000 छिद्रे पाडली आहेत.

कोणतीही इमारत पाडण्यासाठी सुरक्षेची आवश्यकता, वेळेची उपलब्धता आणि इमारतीची टिकण्याची क्षमता या तीन निकषांच्या आधारे पाडण्याची पद्धत निवडली जाते, असं हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत मेहता म्हणाले. “या प्रोजेक्टची माहिती मिळाल्यावर साइटला भेट दिली, त्यानंतर हे टॉवर्स पाडण्यासाठी इम्प्लोजन प्रक्रिया सर्वात योग्य असेल, असं आमच्या लक्षात आलं.

यासाठी डायमंड कटिंगची (Diamond Cutting) आणखी एक टेक्नॉलॉजी वापरता आली असती. परंतु, त्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागला असता. कारण त्या प्रक्रियेत क्रेन वापरून प्रत्येक पिलर, भिंत आणि बीम हळूहळू नष्ट करावे लागले असते. तसंच या प्रक्रियेसाठी इम्प्लोजनपेक्षा जवळपास पाचपट जास्त खर्च आला असता," असं मेहता यांनी सांगितलं.

“याशिवाय रोबोटिक्स टेक्नॉलॉजी (Robotics Technology) हा पर्याय असू शकला असता. परंतु, त्यामुळे खूप आवाज झाला असता आणि इमारतीच्या शेजारी खूप लोक राहतात. शिवाय हे पाडकाम कमीतकमी वेळात व्हावं, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आधीच दिले होते. आमच्याकडे कोची येथील मराडू फ्लॅट्सचे इम्प्लोजन केल्याचा अनुभव होता, त्यामुळे आम्ही ही प्रक्रिया निवडली," असं मेहतांनी नमूद केलं.

अॅपेक्स आणि Ceyanne टॉवर्स पाडल्यानंतर तब्बल 42,000 क्युबिक मीटर राडारोडा पडेल, अशी माहिती मिळतेय. राडारोडा टॉवरच्या आजूबाजूला, बेसमेंटमध्ये आणि रस्त्यावर पडण्याची शक्यता आहे. त्यापैकी काही राडारोडा नोएडामधील एका दुसऱ्या ठिकाणी नेला जाईल. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जाईल.

दरम्यान, नोएडा ट्विन टॉवर्स पाडल्यानंतर त्यातून 4000 टन लोखंड निघणार आहे. त्याची विक्री करून एडिफिस पाडकामाचा खर्च वसूल करणार आहे. तसंच पाडकामानंतर पडणारा राडारोडा हटवण्यासाठी 90 दिवस लागतील आणि ट्रक त्यांना वाहून नेण्यासाठी 1,300 फेऱ्या करतील.

First published: