Home /News /national /

RT-PCR टेस्टच्या माध्यमातून ओमिक्रॉन व्हेरिएंटचं निदान करणं शक्य?, WHO नं दिली माहिती

RT-PCR टेस्टच्या माध्यमातून ओमिक्रॉन व्हेरिएंटचं निदान करणं शक्य?, WHO नं दिली माहिती

Omicron variant: ज्या व्यक्तींना कोरोना विषाणूच्या कोणत्याही प्रकारच्या व्हेरिएंटचा संसर्ग झाला आहे, त्यांना ओमिक्रॉनच्या संसर्गाचा धोका जास्त आहे.

जीनिव्हा, 29 नोव्हेंबर: जगभरात कोरोना विषाणू (Coronavirus) गेली दोन वर्ष थैमान घालतो आहे. लसीकरणाने वेग पकडल्यानंतर सर्वत्र भीतीचं वातावरण कमी झालं होतं आणि रुग्णसंख्याही हळूहळू आटोक्यात येऊ लागली होती. त्यातच आता दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आढळलेल्या ओमिक्रॉन (Omicron Variant) व्हेरिएंटने खळबळ उडवली आहे. B.1.1.529 या कोरोना विषाणूच्या नव्या  व्हेरिएंटला ओमिक्रॉन असं नाव देण्यात आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याला  व्हेरिएंट ऑफ कन्सर्न अर्थात चिंतेचा  व्हेरिएंट असल्याचं म्हटलं आहे. या  व्हेरिएंटमुळे जगभरात भीती पसरलेली असल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी (28 नोव्हेंबर) जागतिक आरोग्य संघटनेने या  व्हेरिएंटबद्दलची काही नवी माहिती नागरिकांना दिली. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या निदानासाठी वापरल्या जाणाऱ्या RT-PCR टेस्टच्या माध्यमातून ओमिक्रॉन  व्हेरिएंटचं निदान करणं शक्य आहे. NGS-SA ने दिलेल्या माहितीनुसार, गौतेंग प्रांतामध्ये ओमिक्रॉन  व्हेरिएंटचा संसर्ग वेगाने पसरत आहे. हा संसर्ग अन्य प्रांतांमध्येही आधीच झाला असावा, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. वेगवेगळ्या क्लस्टर्समध्ये नवे रुग्ण आढळत असल्यामुळे सातत्याने एकूण रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. ओमिक्रॉन  व्हेरिएंटचं म्युटेशन अत्यंत वेगळं असल्याचंही NGS-SA ने स्पष्ट केलं आहे. हेही वाचा- PAK vs BAN: बांगलादेशी खेळाडूच्या डोक्याला लागला आफ्रिदीचा बॉल, सोडावी लागली मॅच ओमिक्रॉन हा  व्हेरिएंट डेल्टा, अल्फा आदी यापूर्वीच्या व्हेरिएंटच्या तुलनेत जास्त संसर्गजन्य आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. म्हणजेच या  व्हेरिएंटमुळे नागरिकांना वेगाने संसर्ग होईल, असंही सांगता येत नाही किंवा ती गोष्ट नाकारताही येणार नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. RT-PCR टेस्टद्वारे हा  व्हेरिएंट ओळखला जाऊ शकतो, ही त्यातल्या त्यात जमेची बाब असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. ज्या व्यक्तींना कोरोना विषाणूच्या कोणत्याही प्रकारच्या  व्हेरिएंटचा संसर्ग झाला आहे, त्यांना ओमिक्रॉनच्या संसर्गाचा धोका जास्त आहे. तसंच, पूर्वी कोरोना संसर्ग होऊन त्यातून बऱ्या झालेल्या व्यक्तींना ओमिक्रॉन  व्हेरिएंटचा संसर्ग सहजतेने होऊ शकतो, असंही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. म्हणूनच आधी कोरोना संसर्ग होऊन गेलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. हेही वाचा- मुख्यमंत्री अधिवेशनाला प्रत्यक्ष उपस्थित राहणार?, अनिल परब यांनी दिली माहिती ओमिक्रॉन  व्हेरिएंटपासून संरक्षण देण्यात कोरोनाप्रतिबंधक लशी किती प्रभावी ठरतील, हे समजून घेण्याचा प्रयत्न जागतिक आरोग्य संघटनेसह (World Health Organization - WHO) अन्य संस्था-संघटना करत आहेत. त्यामुळे आतापर्यंत ज्यांनी लसीकरण केलं आहे, त्यांना या  व्हेरिएंटपासून संरक्षण मिळणार की नाही, हे अद्याप ठामपणे सांगता येणार नाही. ओमिक्रॉन  व्हेरिएंटचा संसर्ग झालेली व्यक्ती किती गंभीररीत्या आजारी पडू शकते, हे अद्याप नेमकं कळलेलं नाही. ओमिक्रॉनची लक्षणं कोरोना विषाणूच्या अन्य  व्हेरिएंटच्या लक्षणांसारखीच आहेत की वेगळी, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. प्राथमिक माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेतल्या हॉस्पिटल्समध्ये संसर्गग्रस्तांची संख्या वाढली आहे; मात्र त्यामागे ओमिक्रॉन  व्हेरिएंटच कारणीभूत आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कारण कोरोना संसर्गग्रस्तांची एकंदर संख्याच वाढलेली असल्यामुळे हे झालेलं असू शकतं. दक्षिण आफ्रिकेतल्या तरुणांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं आढळत आहेत. ओमिक्रॉनचं गांभीर्य किती आहे, हे कळण्यासाठी अजूनही काही आठवड्यांचा कालावधी लागू शकतो? हेही वाचा- कपिल शर्माच्या आईने गिन्नीबदल केली तक्रार; म्हणते, 'सून मला घरी बसूच देत नाही' सर्व तज्ज्ञांनी याच गोष्टीवर भर दिला आहे, की लसीकरण (Vaccination) अत्यंत महत्त्वाचं आहे. नवा  व्हेरिएंट समोर आला आहे, याचाच अर्थ असा आहे, की कोरोना महामारी अद्याप नष्ट झालेली नाही. त्यामुळे कोविड प्रोटोकॉल्सचं (Covid Protocol) पालन करणं अत्यंत आवश्यक असल्याचंच यावरून स्पष्ट झालं आहे.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या