Home /News /maharashtra /

22 डिसेंबरपासून सुरु होणार विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन, 12 विधेयकं मांडणार, मुख्यमंत्री राहणार उपस्थित

22 डिसेंबरपासून सुरु होणार विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन, 12 विधेयकं मांडणार, मुख्यमंत्री राहणार उपस्थित

Maharashtra Assembly Winter Session: राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Session)22 डिसेंबर रोजी मुंबईत (Mumabi) होणार आहे.

    मुंबई, 29 नोव्हेंबर: Maharashtra Assembly Winter Session:राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Session)22 डिसेंबर रोजी मुंबईत (Mumabi) होणार आहे. अनिल परब (Anil Parab) यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. 22 ते 28 डिसेंबर असा कार्यक्रम निश्चित झाला आहे. कालावधी वाढवायचा की नाही याबाबत 24 तारखेला बैठक होणार असल्याची माहितीही अनिल परब यांनी दिलीय. या अधिवेशनात 12 विधेयके मांडली जाणार आहेत. मुख्यमंत्री अधिवेशनाला उपस्थित राहणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तब्येतीमुळे डॉक्टरांनी प्रवास करू नये असे सुचवलं आहे. मात्र विरोधी पक्षाने अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला घ्यावं अशी विनंती केली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी त्याला संमती दिली आहे. इतर बाबींचा विचार करून याबाबत निर्णय घेतला जाईल, असं परब यांनी म्हटलं आहे. हेही वाचा- कपिल शर्माच्या आईने गिन्नीबदल केली तक्रार; म्हणते, 'सून मला घरी बसूच देत नाही' मुख्यमंत्री अधिवेशनाला प्रत्यक्ष उपस्थित राहणार असल्याची महत्त्वाची अपडेट अनिल परब यांनी दिली आहे. तसंच ज्यांचे दोन डोस झाले असतील त्यांनाच अधिवेशनात प्रवेश दिला जाईल. याशिवाय त्यांना आरटीपीसीआर टेस्टही करावी लागणार असल्याचं ते म्हणालेत. हिवाळी अधिवेशन 22 ते 28 डिसेंबर दरम्यान मुंबईत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 22 डिसेंबर ते 28 डिसेंबरदरम्यान मुंबईत होणार आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत अधिवेशनाचे कामकाज एक आठवड्याचे निश्चित करण्यात आले असून पुढील कामकाजासंदर्भात विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक 24 डिसेंबर 2021 रोजी घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. हिवाळी अधिवेशन कालावधीत लसीकरण पूर्ण म्हणजे ‌कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतलेल्यांनाच प्रवेश तसेच आरटीपीसीआर चाचणी देखील अनिवार्य करण्यात आले आहे. दर आठवड्याला ही चाचणी होणार आहे. हेही वाचा-  आजच पूर्ण करा हे काम, अन्यथा मिळणार नाही LPG Subsidy; वाचा सविस्तर मंत्री, राज्यमंत्री यांच्या सोबत केवळ एकाच अधिकाऱ्याला प्रवेश दिला जाणार असून विधानमंडळ सदस्यांचे स्वीय, सहायक, वाहनचालकांसाठी विधान भवनाच्या बाहेरील प्रांगणात स्वतंत्र व्यवस्था राहणार आहे. या काळात खासगी व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Anil parab, Uddhav Thackeray (Politician)

    पुढील बातम्या