मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

कपिल शर्माच्या आईने गिन्नीबदल केली तक्रार; म्हणते, 'सून मला घरी बसूच देत नाही'

कपिल शर्माच्या आईने गिन्नीबदल केली तक्रार; म्हणते, 'सून मला घरी बसूच देत नाही'

कपिल शर्माच्या (Kapil Sharma) 'द कपिल शर्मा शो'मध्ये (The Kapil Sharma Show) शनिवारी 'बॉब बिस्वास' ’ (Bob Biswas) चित्रपटातील मुख्य कलाकार अभिषेक बच्चन(Abhishek Bachchan) आणि चित्रांगदा सिंग आले होते. यावेळी कपिलने प्रेक्षकांसोबत बसलेल्या त्याच्या आईशी संवादही साधला.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 29 नोव्हेंबर - कपिल शर्माच्या (Kapil Sharma) 'द कपिल शर्मा शो'मध्ये (The Kapil Sharma Show) शनिवारी 'बॉब बिस्वास' ’ (Bob Biswas) चित्रपटातील मुख्य कलाकार अभिषेक बच्चन(Abhishek Bachchan) आणि चित्रांगदा सिंग आले होते. यावेळी कपिलने प्रेक्षकांसोबत बसलेल्या त्याच्या आईशी संवादही साधला. अभिषेक आणि चित्रांगदा यांच्या आईची ओळख करून देताना कपिलने सांगितले की, ती मला लग्न करण्यास सांगत होती. पण आता माझे लग्न झाले आहे मात्र ही सून गिन्नीसोबत घरी थांबतच नाही.

कपिलच्या आईने सांगितली मनाची अवस्था

कपिलचे असे बोलणे ऐकून आईने तिच्या मनाची अवस्था सर्वांसमोर सांगितली. ती म्हणाली, 'सुन मला घरी बसू देत नाही, आता मी यावर काय करू?' कपलिच्या आईचे म्हणणे ऐकून शोमध्ये उपस्थित असलेले सर्वजण हसू लागले.

वाचा : म्हशी पेक्षा शिंगं जड; सोनू सूद देणार गरजू कुटुंबाला म्हैस, मात्र घातलीय ही अट

अभिषेक आणि चित्रांगदालाही हसू अनावर

कपिलची आई पुढे म्हणते, 'ती त्याला शो लवकर सोडण्यास सांगते आणि सूट काढते. तेही तेच करतात.'' कपिलच्या आईचे बोलणे ऐकून अभिषेक आणि चित्रांगदाला आपले हसू आवरता आले नाही.

वाचा : 'भावा कतरिनाची काळजी घ्ये'; विकी कौशल-रणबीर कपूरच्या व्हायरल फोटोवर नेटकऱ्याची भन्नाट कमेंट

जेव्हा अमिताभ बच्चन यांनी कपिलच्या आईला विचारला होता अनोखा प्रश्न

सूरतमध्ये 'कौन बनेगा करोडपती 13' च्या शूटिंगवेळी कपिलची आई उपस्थित होती. यावेळी अमिताभ बच्चन यांनी त्यांना विचारले की, कपिलला जन्म देण्यापूर्वी त्यांनी काय खाल्ले होते. यावर त्यांनी निरागसपणे उत्तर दिले होती की, 'दाल फुलका.'

कपिल शर्मा आणि गिन्नी कॉलेजच्या दिवसात चांगले मित्र होते. पण कामामुळे ते एकमेकांपासून वेगळे झाले होते. 12 डिसेंबर 2018 रोजी त्यांनी जालंधरमध्ये लग्न केले. या जोडप्याने अमृतसर, दिल्ली, मुंबई येथे लग्नाचे अनेक रिसेप्शन आयोजित केले होते. आता या दोघांना दोन मुले आहेत.

First published:

Tags: Abhishek Bachchan, Bollywood News, Entertainment, Kapil sharma, The kapil sharma show