मराठी बातम्या /बातम्या /देश /

'कोरोना संकटकाळात मोदींच्या एका हाकेला धावून आले सगळे भारतीय उद्योजक' - CAIT ने केलं कौतुक

'कोरोना संकटकाळात मोदींच्या एका हाकेला धावून आले सगळे भारतीय उद्योजक' - CAIT ने केलं कौतुक

Covid Crisis India: 'देश कोरोनाशी लढत असताना ऑक्सिजनचं संकट उभं राहिलं तेव्हा एकही परदेशी कंपनी किंवा MNC पुढे आली नाही, पण टाटा, अंबानी, जिंदाल यांच्यासारख्या अनेक भारतीय उद्योजकांनी मदत केली.'

Covid Crisis India: 'देश कोरोनाशी लढत असताना ऑक्सिजनचं संकट उभं राहिलं तेव्हा एकही परदेशी कंपनी किंवा MNC पुढे आली नाही, पण टाटा, अंबानी, जिंदाल यांच्यासारख्या अनेक भारतीय उद्योजकांनी मदत केली.'

Covid Crisis India: 'देश कोरोनाशी लढत असताना ऑक्सिजनचं संकट उभं राहिलं तेव्हा एकही परदेशी कंपनी किंवा MNC पुढे आली नाही, पण टाटा, अंबानी, जिंदाल यांच्यासारख्या अनेक भारतीय उद्योजकांनी मदत केली.'

नवी दिल्ली, 25 एप्रिल: कोविडच्या संकटकाळात भारतीय उद्योजकांनी फायद्या-तोट्याच्या गणितांपेक्षा देशहिताचा विचार करत एकी दाखवली. भारतावर ओढवलेल्या ऑक्सिजन संकटावर मात करण्यासाठी टाटा, अंबानी, जिंदाल आणि इतर बड्या उद्योगांनी पुढाकार घेत कोरोना रुग्णांना प्राणवायूचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी एकजुटीने प्रयत्न केले. याबद्दल कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) तर्फे उद्योजकांची प्रशंसा केली आहे. CAIT चे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भारतीय आणि महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी पत्रक काढून या उद्योजकांचं कौतुक केलं आहे.

CAIT चे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं आणि त्याला प्रतिसाद देत अनेक उद्योजक ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी पुढे आले. कोरोना रुग्णांना आणि वैद्यकीय कारणासाठी वापरला जाणाऱ्या ऑक्सिजनमध्ये कमतरता भासू नये यासाठी  प्रयत्न केले. "

Oxygenचा तुटवडा होणार कमी, PM CARES फंडातून मोदी सरकार सुरू करणार 551 प्लांट

"मेडिकल कारणासाठी वापरला जाणाऱ्या ऑक्सिजनचा तुटवडा आहे हे लक्षात येताच भारतीय उद्योजक एकजुटीने पुढे आले. कॉर्पोरेट इंडियाचे आपसात मतभेद असतील, पण ज्या वेळी देशाला दरज होती त्या वेळी ते देशासाठी एकत्र उभे राहिले. अशा संकटकाळात एकही विदेशी किंवा बहुराष्ट्रीय कंपनी पुढे आली नाही, पण भारतीय उद्योगांनी एकजुटीने ऑक्सिजन संकटासाठी प्रयत्न केले", असं CAIT च्या भारतीय आणि खंडेलवाल यांनी म्हटलं आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी, टाटा समूहाचे रतन टाटा, जिंदाल स्टीलचे नवीन जिंदाल, वेदांत समूहाचे अनिल अगरवाल, इंडियन ऑइल लिमिटेडचे माधव वैद्य, भारत पेट्रोलियमचे के. पद्माकर, स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाच्या चेअरपर्सन सोमा मोंडल, JSW चे सज्जन जिंदाल यासारख्या अनेक भारतीय उद्योजकांनी देशाच्या संकटकाळात पुढाकार घेऊन ऑक्सिजन पुरवठ्यासाठी प्रयत्न केले, असं CAIT ने म्हटलं आहे.

देश अडचणीत असताना मदतीला धावून येणारा उद्योग समूह म्हणून ख्याती असलेले टाटा पुन्हा एकदा ऑक्सिजनच्या कमतरतेवर उपाय घेऊन आले आहेत. टाटा समूहाच्या वतीने क्रायोजेनिक ऑक्सिजनचे कंटेनर थेट सिंगापूरहून मागवले. यासाठी भारतीय हवाई दलानेही मदत केली. IAF च्या विमानांमधूनच हे ऑक्सिजन कंटेनर सिंगापूरहून भारतात आले. आता भारतातल्या कोविड संकट काळातली ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी थोडी मदत होईल.

Covid Crisis: टाटा आले धावून! ऑक्सिजनच्या तुटवड्यानंतर सिंगापूरहून मागवले कंटेनर

वैद्यकीय सेवेसाठी ऑक्सिजनची कमतरता दूर होण्याच्या दृष्टीने आता युद्धपातळीवर हालचाली होत आहेत. भारतीय सैन्यही त्यासाठी कोरोना लढ्यात उतरलं आहे. खास रेल्वे, विमान मार्गाने ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो आहे. त्यात आता टाटांसारख्या उद्योगाने देशाबाहेरून ऑक्सिजन मागवला आहे. त्यासाठी त्यांनाही भारतीय वायुदलाची मदत मिळाली.

फर्टिलायजर कंपनी इफ्को (IFFCO)ने 30 मेला आपला नवीन प्लांट कार्यान्वित होत असल्याची घोषणा केलीये.

First published:

Tags: Coronavirus, Mukesh ambani, Reliance Industries, Tata group