मराठी बातम्या /बातम्या /देश /

Covid Crisis: टाटा आले धावून! ऑक्सिजनच्या तुटवड्यानंतर IAF च्या मदतीने सिंगापूरहून मागवले क्रायोजेनिक कंटेनर

Covid Crisis: टाटा आले धावून! ऑक्सिजनच्या तुटवड्यानंतर IAF च्या मदतीने सिंगापूरहून मागवले क्रायोजेनिक कंटेनर

टाटा समूहाच्या वतीने क्रायोजेनिक ऑक्सिजनचे कंटेनर थेट सिंगापूरहून मागवले.

टाटा समूहाच्या वतीने क्रायोजेनिक ऑक्सिजनचे कंटेनर थेट सिंगापूरहून मागवले.

टाटा समूहाच्या वतीने क्रायोजेनिक ऑक्सिजनचे कंटेनर थेट सिंगापूरहून मागवले.

नवी दिल्ली, 25 एप्रिल: देश अडचणीत असताना मदतीला धावून येणारा उद्योग समूह म्हणून ख्याती असलेले टाटा पुन्हा एकदा ऑक्सिजनच्या कमतरतेवर उपाय घेऊन आले आहेत. टाटा समूहाच्या वतीने क्रायोजेनिक ऑक्सिजनचे कंटेनर थेट सिंगापूरहून मागवले. यासाठी भारतीय हवाई दलानेही मदत केली. IAF च्या विमानांमधूनच हे ऑक्सिजन कंटेनर सिंगापूरहून भारतात आले. आता भारतातल्या कोविड संकट काळातली ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी थोडी मदत होईल.

वैद्यकीय सेवेसाठी ऑक्सिजनची कमतरता दूर होण्याच्या दृष्टीने आता युद्धपातळीवर हालचाली होत आहेत. भारतीय सैन्यही त्यासाठी कोरोना लढ्यात उतरलं आहे. खास रेल्वे, विमान मार्गाने ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो आहे. त्यात आता टाटांसारख्या उद्योगाने देशाबाहेरून ऑक्सिजन मागवला आहे. त्यासाठी त्यांनाही भारतीय वायुदलाची मदत मिळाली.

टाटा समूहाच्या वतीने सांगण्यात आलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत टाटा समूहाने आपला कोविडविरुद्धचा लढा बळकट करण्यासाठी होईल ती मदत करण्याचं ठरवलं आहे. आपल्या वैद्यकीय क्षेत्राला आवश्यक असणारे ऑक्सिजन त्यासाठी मागवण्यात आले आहेत."

टाटाच्या वतीने मोठी ऑक्सिजनची गरज भागवण्यात येणार आहे.

Oxygenचा तुटवडा होणार कमी, PM CARES फंडातून मोदी सरकार सुरू करणार 551 प्लांट

त्यासाठी 4 क्रायोजेनिक कंटेनरचा पहिला ताफा भारतात पोहोचला आहे आता तो तुटवडा असेल त्या ठिकाणी पाठवण्यात येईल.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) मोठी घोषणा केली आहे. PM CARES फंडामधून 551 PSA मेडिकल ऑक्सिजन प्लांट लावणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. लवकरात लवकर हे प्लांट सुरू करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले आहेत.

First published:

Tags: Coronavirus, Oxygen supply, Tata group