नवी दिल्ली, 25 एप्रिल : कोरोना रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी देशाला सध्या मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची (Oxygen Supply) आवश्यकता भासत आहे. सर्वच रुग्णालयांमध्ये ऑक्सिडनचा तुटवडा निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) मोठी घोषणा केली आहे. PM CARES फंडामधून 551 PSA मेडिकल ऑक्सिजन प्लांट लावणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. लवकरात लवकर हे प्लांट सुरू करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले आहेत. प्रामुख्यानं जिल्हा मुख्यालयाच्या सरकारी रुग्णालयांमध्ये हे प्लांट सुरू केले जाणार आहेत. त्यामुळं जिल्हा स्तरावरील ऑक्सिजनचा तुटवडा कमी होण्यास मदत होणार आहे. हे प्लांट सुरू करण्यासाठी केंद्र सरकारनं निधी मंजूर केला असून लवकरात लवकर ते सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. तसंच हे प्लांट सुरू करण्यासाठी आरोग्य मंत्रालयांकडून उपकरणांची खरेदी केली जाणार आहे. जिल्हा रुग्णालयांमध्ये हे प्लांट केंद्र सरकार सुरू करणार आहेत.
Oxygen plants in every district to ensure adequate oxygen availability...
— Narendra Modi (@narendramodi) April 25, 2021
An important decision that will boost oxygen availability to hospitals and help people across the nation. https://t.co/GnbtjyZzWT
फडणवीसांनी मानले मोदींचे आभार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्सिजनच्या मुबलक पुरवठ्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. महाराष्ट्रातील नागरिकांना सर्वाधिक मदतीबद्दल मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांचे अनेकानेक आभार. महाराष्ट्राला सर्वाधिक 1785 मेट्रीक टन ऑक्सिजन, जो गुजरात, उत्तरप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश यांच्यासह कोणत्याही प्रमुख राज्याशी तुलना केली तर जवळजवळ दुप्पटीहून अधिक आहे. तो दिल्याबद्दल फडणवीस यांनी मोदींचे आभार मानले आहेत.
असे काम करतात PSA PLANT PSA प्लांट हे लिक्विड मेडिकल ऑक्सिजनला पर्याय म्हणून ठेवत असतात. हे प्लांट 4 आठवड्यांत तयार होऊ शकतात आणि एका आठवड्यांत ते रुग्णालयांमध्ये लावता येऊ शकतात. त्यासाठी 40 ते 50 लाखांच्या आसपास खर्च येतो. PSA PLANT (Pressure Swing Adsorption Oxygen plants) बहुतांश रुग्मालयांमध्ये नाही. या प्लांटचं वैशिष्ट्य म्हणजे याद्वारे वायूपासून वायू तयार केला जातो. तर लिक्विड मेडिकल ऑक्सिजन मोठ्या प्लांटमध्ये तयार होतो. गॅसपासून लिक्विड तयार करून ते टँकरद्वारे रुग्णालयांत पोहोचवले जाते. महाराष्ट्रात इथे लावणार PSA प्लांट महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, उस्मानाबाद येथे ही झाडे उभारली जातील. , लातूर, नांदेड, हिंगोली, अकोला, बुलढाणा, वाशिम, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये हे प्लांट लावले जाणार आहेत. ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकार आमनेसामने उभे ठाकल्याचं पाहायला मिळालं होतं. पण त्यानंतर तातडीनं प्रयत्न करण्यात आले असून ऑक्सिजनचा तुटवडा होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यात भविष्याच्या दृष्टीनंदेखिल PSA प्लांट च्या माध्यमातून निर्णय घेतले जात आहेत.