काबूल, 17 ऑगस्ट : तालिबानने (Taliban) काबूलसह (Kabul) अफगाणिस्तानातील (Afghanistan) जवळपास सर्वच भागांवर आपला कब्जा मिळवला आहे. अफगाणिस्तान देशातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तेथील लोक आपलाच देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. अफगाणिस्तान, काबूलमध्ये अनेक भारतीय नागरिकही (Indian Citizens) अडकले आहेत. याचदरम्यान सेनेचं C-17 विमान 150 भारतीय नागरिकांना घेऊन काबूलहून जामनगर (Jamnagar) येथे पोहोचलं आहे. विमान जवळपास 11.25 मिनिटांनी जामनगरमध्ये लँड झाल्याची माहिती आहे. या विमानात अधिकतर दुतावासचे कर्मचारी आहेत.
Indian Air Force C-17 aircraft that took off from Kabul with Indian officials has landed in Jamnagar, Gujarat: Sources pic.twitter.com/5j4eDYbKEn
— ANI (@ANI) August 17, 2021
काबूलमधून जामनगर येथे पोहोचलेल्या भारतीय नागरिकांमध्ये दुतावास, काही पत्रकार आणि सर्वसामान्य नागरिकही आहेत.
अफगाणिस्तानातील धक्कादायकVIDEO,देशाबाहेर पडण्यासाठी विमानाच्या टपावर चढले अफगाणी
मिळालेल्या माहितीनुसार, काबूलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भारतीय नागरिक अडकले आहेत. एका कंपनीचे काही कर्मचारी काबूल एअरपोर्टजवळ असणाऱ्या एका हॉटेलमध्ये अडकले असल्याची माहिती मिळत असून याच्या विमानाचं उड्डाण 16 ऑगस्ट रोजी रद्द झालं होतं.
काबूल विमानतळावर येण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीवर तालिबानीकडून गोळीबार, पाहा घटनेचा थरारक VIDEO
दरम्यान, रविवारी अफगाणिस्तानातून पलायन करण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक काबूल विमानतळावर पोहोचले होते. कसंही करुन या देशातून बाहेर पडण्यासाठी ते अतिशय जीवघेणा प्रवास करतानाचे काही भयंकर व्हिडीओ समोर आले.