नवी दिल्ली, 03 जुलै : दिल्लीत बुराडी भागात भाटिया कुटुंबातल्या 11 जणांच्या मृत्यूचं गूढ उलगडण्याचा प्रयत्न पोलीस करतायत. राजस्थानमध्ये राहणारे एक जण या कुटुंबाच्या अगदी जवळचे आहेत. त्यांनी सांगितलं, हे कुटुंब धार्मिक आणि सोशल होतं.
राजस्थानमधल्या कृष्णानं बऱ्याच गोष्टींचा उलगडा केलाय. कृष्णा म्हणाले, कुटुंबातली एक सून त्यांची सहकारी होती. कृष्णाचेही या कुटुंबाशी चांगले संबंध होते. कुटुंबातला मुलगा ललित काही दिवसांपूर्वी राजस्थानला आला होता.मोठा भाऊ दिनेशच्या अपघातानंतर ललितनं त्याची सेवा केली होती.
भाटिया कुटुंब रोज रात्री 10 वाजता एकत्र बसून हनुमान चालिसा वाचायचं. ते हनुमान भक्त होते. या सगळ्यांनी सामूहिक आत्महत्या केली असेल यावर कृष्णाचा विश्वास नाही.
हेही वाचा
हजारो मुंबईकरांचा जीव वाचवणारा मोटरमन 'चंद्रशेखर सावंत'
बुराडी प्रकरण : 11 पाईप, 11 दरवाजे 11 खिडक्या आणि 11 मृतदेह, काय आहे कनेक्शन ?
पोलीस तपासाअंतर्गत आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे या घरात एक रजिस्टर मिळालं. त्या रजिस्टरचं थेट कनेक्शन हे या 10 जणांच्या मृत्यूशी आहे. कारण मरण्याचा संपूर्ण प्लान या रजिस्टरमध्ये लिहला आहे.
कोण कुठे आणि कसं मरणार याचा संपूर्ण विश्लेषण या रजिस्टरमध्ये लिहलं आहे. कोण कोणत्या जागेवर उभं राहून फाशी घेणार याचा सगळा तपशील यात लिहला आहे आणि यात लिहल्याप्रमाणेच या सगळ्यांचे मृतदेह पोलिसांना सापडले.
क्राईम ब्रांचच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या रजिस्टरच्या सुरूवातीच्या पानांवर सगळ्यांच्या नावासकट त्यांची फाशी घेण्याची जागा याबद्दल लिहलं आहे. कोण खुर्चीवरून फाशी घेणार, कोण दरवाजाजवळ फाशी घेणार हे सगळं या रजिस्टरमध्ये लिहलं आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा