मुंबई, 03 जुलै : मागच्या अनेक दिवसांपासून परराष्ट्र मंत्री सुक्षमा स्वराज यांना पासपोर्ट प्रकरणात ट्रोल करण्यात आलं. हे प्रकरण कुठे शांत होत नाही तर सोमवारी काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांना ट्विटरवरून त्यांच्या 10 वर्षांच्या मुलीच्या बलात्कारी धमकी देण्यात आली आहे. काही दिवसांआधी मध्य प्रदेशच्या मंदसोरमध्ये 8 वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण आणि नंतर बलात्कार केल्याची घटना घडली होती, त्यासंदर्भात प्रियांका चतुर्वेदी यांना त्यांच्या मुलीच्या बलात्काराची धमकी देण्यात आली आहे. पूल कोसळून पश्चिम रेल्वे सेवा विस्कळीत, जाणून घ्या या महत्त्वाच्या 10 गोष्टी प्रियांका चतुर्वेदी यांनी मुंबईमध्ये गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी सांगितलं की, ‘मी तक्रार दाखल केली आहे, पोलिसांनी योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.’ या प्रकरणात काँग्रेसच्या इतर नेत्यांनी प्रियांका चतुर्वेदी यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ‘हे तेच लोक आहेत ज्यांनी सुक्षमा स्वराज यांना ट्रोल केलं. भाजपच्या काही राक्षसांकडून असे प्रकार केले जात आहेत’ असं काँग्रेस नेते अभिषेक सिंघवी यांनी म्हटलं आहे. पश्चिम रेल्वे वाहतूक विस्कळीत, या मार्गांवरून करू शकता प्रवास ! दरम्यान, पासपोर्टच्या वादावरून ट्विटरवर सुक्षमा स्वराज यांना ट्रोल करण्याचं सत्र सुरू होतं. शनिवारी एका ट्विटर युजरने सुषमा यांचे पती स्वराज कौशल यांना ट्विट केलं. त्यात भाजप आणि परराष्ट्र मंत्री यांच्यावर आरोप लावत सुषमा घरी आल्यानंतर त्यांना मारा आणि समज द्या की मुस्लिम लोक भाजपला कधीही मतदान करणार नाहीत. यावर स्वराज कौशल यांनी त्या ट्विटचा स्क्रिनशॉट काढून तो पोस्ट केला. त्यात असं लिहलं होतं की, ‘आज रात्री जेव्हा त्या घरी येतील तेव्हा त्यांना मारा आणि समज द्या की मुस्लिमांमध्ये मतभेद करू नये. मुस्लिम लोक भाजपला मतदान नाही करणार.’ स्वराज यांनी शेअर केलेलं हे ट्विट परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीदेखील लाईक केलं आहे. त्याचबरोबर असं ट्विट करणाऱ्या मुकेश गुप्ताचं आणखी एक ट्विट सुषमा यांनी लाईक केलं आहे. त्यामुळे आता या ट्विटर ट्रोलिंगवर मुंबई पोलीस काय कारवाई करतात याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







