Budget 2020 : PMC बँक घोटाळ्यानंतर खातेदारांना दिलासा, 5 लाखांच्या ठेवी सुरक्षित

Budget 2020 : PMC बँक घोटाळ्यानंतर खातेदारांना दिलासा, 5 लाखांच्या ठेवी सुरक्षित

PMC बँकेच्या घोटाळ्यामुळे खातेदारांना या बँकेत ठेवलेल्या ठेवींची चिंता आहे. बँकेत गैरव्यवहार झाले तर खातेदारांचे 1 लाख रुपये सुरक्षित राहतील, असा नियम होता. आता मात्र या बजेटमध्ये खातेदारांना दिलासा देण्यात आला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी :  PMC बँकेच्या घोटाळ्यामुळे खातेदारांना या बँकेत ठेवलेल्या ठेवींची चिंता आहे. बँकेत गैरव्यवहार झाले तर खातेदारांचे 1 लाख रुपये सुरक्षित राहतील, असा नियम होता. आता मात्र या बजेटमध्ये खातेदारांना दिलासा देण्यात आला आहे. खातेदारांच्या 5 लाख रुपयांच्या ठेवी आता सुरक्षित असतील.

2019 मध्ये करदात्यांनी सरकारी बँकांमध्ये केलेल्या गुंतवणुकीमध्ये त्यांचं मोठं नुकसान झालं. बजेटच्या आधी एक दिवस प्रसिद्ध झालेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात दिलेल्या माहितीनुसार, सरकारी बँकांमध्ये करदात्यांनी 4 लाख 30 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. सरकारी बँकांमध्ये गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या पैशांवर एक रुपयावर 23 पैशांचं नुकसान झालं आहे. एकूण 4 लाख 30 हजार कोटी रुपयांवर 98 हजार 900 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.

(हेही वाचा : Budget 2020 : 5 लाखांच्या उत्पन्नावर कर नाही, इनकम टॅक्समध्ये घसघशीत सवलत)

खाजगी बँकांमध्ये गुंतवणुकीचा फायदा

1991 पासून आतापर्यंत नव्या खाजगी बँकांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर सामान्य लोकांना चांगला फायदा झाला. 2019 मध्ये केलेल्या प्रत्येक रुपयवर 9.6 पैशांचा फायदा झाला. याबद्दलची माहिती आर्थिक सर्वेक्षण अहवालात देण्यात आली आहे. सरकारी बँकांच्या विश्वासार्हतेवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. सरकारी बँका आणि आर्थिक उदारीकरणानंतर लायसन्स मिळवणाऱ्या बँका एकाच प्रकारच्या मार्केटमध्ये ऑपरेट होतात. अशा वेळी सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या जबाबदारीवर लक्ष देण्याची गरज आहे.

(हेही वाचा ; Budget 2020: दिल्ली - मुंबई एक्सप्रेस वे लवकरच होणार, अर्थमंत्र्यांची घोषणा)

नुकसानाची रक्कम फूड सबसिडीएवढी

करदात्यांनी बँकेत गुंतवलेल्या रकमेवर जे नुकसान झालं आहे ती रक्कम फूड सबसिडीएवढी आहे. ही नुकसानाची रक्कम 1.40 लाख कोटी रुपये आहे आणि एवढी रक्कम फूड सबसिडीएवढी आहे.

=======================================================================================

First published: February 1, 2020, 1:31 PM IST

ताज्या बातम्या